yuva MAharashtra एच आय व्ही संसर्गित रूग्णांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत - जिल्हाधिकारी अशोक काकडे

एच आय व्ही संसर्गित रूग्णांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत - जिल्हाधिकारी अशोक काकडे


जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीत निर्देश

 

 

 

सांगली, दि. 23 (जि. मा. का.) – एच आय व्ही संसर्गित रूग्णांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा, उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणे व त्यांचा विवाह होण्यासाठी प्रयत्न करणे यावर लक्ष केंद्रित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कामकाज करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.

 

जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, कार्यक्रम व्यवस्थापक विवेक सावंत, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ यांच्यासह वैद्यकीय अधिकारीविविध विभागांचे अधिकारी, आरोग्य क्षेत्रातील प्रतिनिधी, या विषयात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, एच आय व्ही संसर्गित स्वावलंबी व्हावेत, यासाठी त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात. यासाठी रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून अशा एडस्‌बाधितांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यावे. तसेच, त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी जिल्हा नियोजन समिती नाविन्यपूर्ण योजनेमधून निधी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, एच आय व्ही संसर्गितांच्या विवाहासाठी वधू वर परिचय मेळावा आयोजित करावा, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 


जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, संजय गांधी निराधार योजना यासारख्या सामाजिक आर्थिक सहाय्य योजनांचा लाभ जिल्ह्यातील एच आय व्ही संसर्गितांना देण्यात येत आहे. त्याचबरोबर सर्व रूग्णांच्या शिधापत्रिका काढून त्यांना पुरवठा विभागाकडून अन्नधान्य वितरीत होत असल्याची खात्री करावी. त्यांची 100 टक्के आभा कार्ड नोंदणी करून घ्यावी. जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या माध्यमातून होत असलेल्या कार्यवाहीचा सर्वसमावेशक केस स्टडीनिहाय अभ्यास करावा. एडस्‌बाधितांची संख्या अधिक असलेल्या गावात अधिक जनजागृती करावी, असे त्यांनी सूचित केले.

 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी यावेळी जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

 

        यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण रूग्णांची तपासणी व त्यामध्ये संसर्गितांचे प्रमाणतालुकानिहाय एच. आय. व्ही. बाधित रूग्णसंख्याए. आर. टी. सेंटरमधील उपचारएच. आय. व्ही टी. बी. समन्वयगर्भवती मातांची तपासणी व संसर्गाचे प्रमाण आदिंचा आढावा घेण्यात आला.

            जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे कार्यक्रम व्यवस्थापक विवेक सावंत, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ यांनी एड्स नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाची सादरीकरणातून माहिती दिली.


हेही पहा --




https://youtube.com/shorts/QHdreUURe_o?si=sDwvPl3Wd4K8BRIn






🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰