सांगली, दि. २३, (जि. मा. का.) : खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांकडून डी.ए.पी. खताची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. डी.ए.पी. खतात १८ टक्के नत्र व ४६ टक्के स्फुरद ही मुलद्रव्ये आहेत. डी.ए.पी. खताला पर्यायी खते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या पर्यायी खतांचा शेतकऱ्यांनी वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
एक गोणी डी.ए.पी. खतास पर्याय पुढीलप्रमाणे - पर्याय - १ - १/२ गोणी युरिया + ३ गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट. सिंगल सुपर फॉस्फेट खतामधून गंधक मुलद्रव्य मिळते. पर्याय - २ - १/२ गोणी युरिया + १ गोणी ट्रिपल सुपर फॉस्फेट. ट्रिपल सुपर फॉस्फेट खतामधून गंधक मुलद्रव्य मिळते. पर्याय - ३ - ३७ कि.ग्रॅ. २४-२४-०० + ८७ कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट. पर्याय - ४ - ४५ कि.ग्रॅ. २०-२०-०-१३ + ८७ कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट. खतामधून गंधक मुलद्रव्य मिळते. पर्याय - ५ - ७१ कि.ग्रॅ. १२-३२-१६. अतिरिक्त पोटॅश मूलद्रव्य मिळते. पर्याय - ६ - ५९ कि.ग्रॅ. १५-१५-१५ + ८७ कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट. अतिरिक्त पोटॅश व गंधक मूलद्रव्य मिळते. पर्याय - ७ - ५७ कि.ग्रॅ. १६-१६-१६ + ८७ कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट. अतिरिक्त पोटॅश व गंधक मूलद्रव्य मिळते. पर्याय - ८ - ४८ कि.ग्रॅ. १९-१९-१९ + ८७ कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट. अतिरिक्त पोटॅश व गंधक मूलद्रव्य मिळते.
हेही पहा --
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰