yuva MAharashtra संजय माने यांच्या ऑडिट कामाची चौकशीसाठी तुफान सेनेचे 23 रोजी आंदोलन...

संजय माने यांच्या ऑडिट कामाची चौकशीसाठी तुफान सेनेचे 23 रोजी आंदोलन...




सांगली : विशेष लेखापरीक्षक वर्ग2सहकारी संस्था पणन सांगली येथील अधिकारी संजय दामोदर माने,यांनी केलेल्या ऑडिट कामाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुफान सेनेच्या वतीने, जिल्हाधिकारी कार्यालया समोर दिनांक 23-6-2025 रोजी धरणे आंदोलन करणार असल्याची माहीती, तुफान सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.नितीनभाऊ बडेकर यांनी प्रसार माध्यमांना दिली.
   पुढे ते म्हणाले संजय माने यांनी कार्यालयात राष्र्टपुरुषांचे फोटो लावले नव्हते,नागरीकाची सनद प्रसिद्ध केली नव्हती, अभ्यंगताचा अभिप्राय फाॅर्म ठेवला नव्हता. या दप्तर दिरंगाई कारनस्तव त्यांच्यावर शिस्त भंगाची कार्यवाई व्हावी यासाठी संबधीत विभागाना एक महीण्यापुवी पत्रव्यवहार केला असून, त्यांनी केलेल्या ऑडिट कामात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा संशय व्यक्त होतो. तरी त्यांनी केलेल्या  ऑडिट कामाची सखोल चौकशी करावी, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, आणी त्यांच्या काॅल डीटेलची चौकशी करून त्यांचावर कारवाई करावी यासाठी तुफान सेनेच्यावतीने दिनांक 23-6-2025 रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहीती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसार माध्यमांना दिली.

मा.नितीनभाऊ बडेकर
संस्थापक अध्यक्ष तुफान सेना

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰