सांगली, दि. 28 (जि.मा.का.) : राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे गुरूवार, दिनांक 29 मे 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या सुधारीत दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
गुरूवार, दिनांक 29 मे रोजी दुपारी 2 वाजता कोल्हापूर विमानतळ येथून मोटारीने विटा, जि. सांगली कडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता जय मातादी मंगल कार्यालय विटा येथे नॅशनल गोल्ड, सिल्व्हर रिफायनर्स आणि ज्वेलर्स असोसिएशन विटा आयोजित सोने-चांदी गलाई बांधव, ज्वेलर्स व मायक्रो रिफायनर्स बांधवांच्या मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता राष्ट्रकुल कुस्ती आखाडा विटा येथे सदिच्छा भेट. सायंकाळी 5.30 वाजता विटा येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰