yuva MAharashtra सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात पद भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात पद भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन



        सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगली यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलां/मुलींचे वसतिगृह येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, माजी सैनिक पत्नी मधून अशासकीय पदे भरावयाची आहेत. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दिनांक 29 मे 2025 रोजी सकाळी 9.45 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरावयाची पदे पुढीलप्रमाणे. सहायक वसतीगृह अधिक्षक /अधिक्षिका – 02 पुरूष मुलांच्या वसतिगृहासाठी व 02 महिला मुलींच्या वसतीगृहासाठी, चौकीदार – 02 (मुलांच्या व मुलींच्या वसतीगृहासाठी प्रत्येकी एक), सफाई कामगार – 03 (मुलांचे वसतीगृह, मुलींचे वसतीगृह व विश्रामगृह यासाठी प्रत्येकी एक), स्वयंपाकी महिला – 08 (मुलांच्या व मुलींच्या वसतीगृहासाठी प्रत्येकी 4), माळी – 02 (मुलांच्या व मुलींच्या वसतीगृहासाठी प्रत्येकी एक).

            अधिक माहितीसाठी 0233-2990712 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. माजी सैनिक / माजी सैनिक विधवांना प्राधान्य देण्यात येईल. सहायक वसतीगृह अधिक्षक सेवानिवृत्त एनसीओ /जेसीओ असावा. चौकीदार सेवानिवृत्त सैनिक असावा, टंकलेखन / संगणकाचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰