yuva MAharashtra शेतकऱ्यांसाठी मोठ्या दोन बातम्या ; १) अनुदानावर बियाणे, निविष्ठांसाठी 29 मे पर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत २) प्रमाणित बियाणे वितरणाकरिता 29 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज मागणी

शेतकऱ्यांसाठी मोठ्या दोन बातम्या ; १) अनुदानावर बियाणे, निविष्ठांसाठी 29 मे पर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत २) प्रमाणित बियाणे वितरणाकरिता 29 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज मागणी




अनुदानावर बियाणे, निविष्ठांसाठी 29 मे पर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत


सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया (NMEO-OS) अभियान व अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके सन २०२५-२६ अंतर्गत पिक प्रात्यक्षिक घटकाकरीता माहाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची मुदत 29 मे 2025 पर्यंत आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी या घटकाचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in farmer login या संकेतस्थळावर विहीत मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया व अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके सन २०२५-२६ अंतर्गत नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्या आहे. या अभियानांतर्गत सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल, तूर, मुग, उडीद,मका, ज्वारी, बाजरी, नाचणी या पिकांसाठी सांगली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रामातंर्गत खरीप हंगामा मध्ये सोयाबिन, भुईमुग, सुर्यफुल, तूर, मुग, उडीद,मका, ज्वारी, बाजरी, नाचणी पिकाचे सुधारीत तंत्रज्ञानावर आधारीत पिक प्रात्यक्षिके घटकात अनुदानावर बियाणे व निविष्ठा ही बाब शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इत्यादीद्वारे राबविण्यात येणार आहे. याकरीता महाडीबीटी पोर्टलद्वारे नोंदणीकृत शेतकरी गट / कंपनी / संस्था यांची निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येणार आहे.

अ.क्र

बाब

अनुदानाचा दर

समाविष्ट निविष्टा

सलग पिक प्रात्यक्षिके (तुर,मुग,उडीद )

उच्चतम मर्यादा रु. ९००० प्रती हेक्टर

सुधारीत बियाणे बिजप्रक्रियेसाठी निविष्ठा, सूक्ष्म मुलद्रव्य पिक सरंक्षण औषधे, तणनाशके, प्रगतशील शेतकरीतज्ञ मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन इ.

सलग पिक प्रात्यक्षिके (बाजरी,मका)

उच्चतम मर्यादा रु. ७५०० प्रती हेक्टर

आंतरपिक प्रात्यक्षिके (तुर आंतरपिक सोयाबीन)

उच्चतम मर्यादा रु. ९००० प्रती हेक्टर

पिक पध्दतीवर आधारीत पिक प्रात्यक्षिके (मुग नंतर ज्वारीमुग नंतर गहूउडीद नंतर ज्वारीउडीद नंतर गहूबाजरी नंतर हरभरा )

उच्चतम मर्यादा रु. १५००० प्रती हेक्टर

सलग पिक प्रात्यक्षिके (सोयाबीन)

उच्चतम मर्यादा रु. १०००० प्रती हेक्टर

सलग पिक प्रात्यक्षिके (भुईमुग)

उच्चतम मर्यादा रु. १४००० प्रती हेक्टर

सलग पिक प्रात्यक्षिके (सुर्यफुल)

उच्चतम मर्यादा रु. ९००० प्रती हेक्टर

        निवड निकष - शेतकरी गटशेतकरी उत्पादक कंपनीकृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था ३१ मार्च२०२४ पूर्वी नोंदणी असणे आवश्यक आहे. शेतकरी गट कोणत्याही शासन यंत्रणेकडे नोंदणीकृत असावा. (जसे किआत्मामहाराष्ट्र ग्रामीण जीवोन्त्रोत्ती अभियान (MSRLM), राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्त्रोत्ती अभियान (NRLM), महिला आर्थिक विकास महामंडळनाबार्ड इ.). पीक प्रात्यक्षिकाची अंमलबजावणी करताना शेतकरी गटांना अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गाच्या खातेदारांच्या उपलब्धतेनुसार सदर प्रवर्गाच्या शेतकरी व महिलांना विहित प्रमाणानुसार लाभ देणे बंधनकारक राहील. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे. सदरील शेतकऱ्यांचा गटामध्ये समावेश नसल्यास नव्याने नोंदणी करून समावेश करावा. लाभ द्यावयाच्या एकूण लाभार्थ्यांपैकी ३० टक्के महिला लाभार्थी असावेतनिवड झालेल्या शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी/कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी योजना मार्गदर्शक सुचनेमध्ये दिलेप्रमाणे प्रपत्र-१ नुसार हमीपत्र द्यावे. आवश्यक प्राधान्यक्रमाप्रमाणे शेतकरी गटामध्ये उपलब्ध नसतील तरगटाबाहेरील पात्र शेतकऱ्यांची निवड करता येईल. एका कुटुंबातील (पतीपत्नी व १८ वर्षा खालील अपत्य) एकाच व्यक्तीस लाभ देण्यात यावा. पीक प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या गटात २५ पेक्षा जास्त शेतकरी असल्यास संबंधित गटाने २५ शेतकन्यांची निवड करावयाची आहे. गटामध्ये जे शेतकरी शासनाने ठरवून दिलेल्या तंत्रज्ञानाप्रमाणे पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यास तयार असतील अशाच शेतकऱ्यांची निवड लाभार्थी म्हणून करावी. गटातील शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना ॲग्रीस्टॅक (Agristack) वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी गटाची निवड ही महाडीबीटी पोर्टलद्वारे होणार असल्याने कृषी विभागाकडील विहित नमुन्यातील हमीपत्र देण्यास तयार असावे. प्रात्यक्षिकाच्या लाभार्थीसाठी मृदा आरोग्य कार्ड (Soil Health Card) मृदा चाचणी/केलेली असावी.

अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. कुंभार यांनी केले आहे.


 

 

प्रमाणित बियाणे वितरणाकरिता

29 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज मागणी

 

 

सांगलीदि. 27, (जि. मा. का.) : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्या असून यामध्ये समूह आधारित कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत सोयाबीनभुईमुगसुर्यफुल या पिकांसाठी सांगली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रामातंर्गत खरीप हंगामामध्ये सोयाबिन, भुईमुग व सुर्यफुल पिकाचे प्रमाणित बियाणे 100 ट्क्के अनुदानावर शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वसाधारणअनुसुचीत जातीअनुसुचीत जमाती प्रवर्गातील सर्व शेतकऱ्यांनी या घटकाचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक लाभार्थीनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in farmer login या संकेतस्थळावर 29 मे 2025 पर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 

 यामध्ये 0.20 हेक्टर ते जास्तीत जास्त 1 हेक्टर मर्यादेत बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याकरीता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून, त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबीच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰