मा. खासदार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया ---
पलूस दि. 30 : कुंडल ता. पलुस येथील अती प्राचीन अतिशय तिर्थ क्षेत्रावरील पुरातन मुर्तींची विटंबना करणार्या आरोपींना तात्काळ अटक करा व त्यांच्यावर कडक करवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजु शेट्टी यांनी केली आहे.
यावेळी संदीप राजोबा, श्री. 1008 कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर जैन सिद्ध अतिशय क्षेत्र कुंडल ट्रस्टचे ट्रस्टी दिपक वर्णे,तिर्थराज नवग्रह जिन मंदीरचे उपाध्यक्ष सचिन लडगे ट्रस्टी प्रफुल्ल पाटील, तसेच अँड. दिपक लाड, प्रमुख उपस्थित होते.
कुंडल येथील अतिशय क्षेत्र असणारर्या गिरी पार्श्वनाथ पहाडा वरील मंदीरातील प्राचिन गिरी पार्श्वनाथ मुर्तीची व पद्मावती देवीच्या मुर्तीची तोडफोड करुन विटंबना करुन तिर्थक्षेत्रावर वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत मंगळवार दि. 29 रोजी माजी खासदार राजु शेट्टी यांनी घटनास्थळाला भेट देवून या घटनेची माहीती घेत कुंडल पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयसींग पाटील यांचेशी दुरध्वनी वरुन संपर्क साधत या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करुन कडक कारवाई करावी अशी विनंती केली.
यावेळी माजी खासदार राजु शेट्टी म्हणाले की, जैन धर्म हा अतिशय शांततेच्या मार्गाने जाणारा आहे आज पर्यत अशा घटना कुठे ही घडलेल्या नाहीत परंतु काही समाजकंटक या कुंडल मधील तिर्थ क्षेत्रावरचे वातावरण जाणुन बुजुन गढुळ करत आहेत हे थांबले पाहिजे असा प्रकार आता इथुन पुढे सहन केला जाणार नाही.. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी संदीप राजोबा म्हणाले की कुंडलला जैन समाज हा अल्प आहे परंतू मी व आमचा सर्व गाव कुंडल ट्रस्टच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे इथुन पुढे जर काही अनुचित प्रकार घडला तर गाठ आमच्याशी आहे असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰