yuva MAharashtra छावा चित्रपटाद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जीवित - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छावा चित्रपटाद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जीवित - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



मुंबईदि.५: छत्रपती संभाजी महाराज वीर पुरुष होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याचे रक्षण छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. चरित्रकारांनी त्यांच्यावर अन्याय केला, मात्र छावा चित्रपटाने ऐतिहासिक तत्व कायम ठेवून छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जीवित केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नरिमन पॉईंट येथील आयनॉक्स थिएटरमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळ सदस्यमंत्री यांच्यासाठी आयोजित छावा चित्रपटाचा शोप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.



यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरउपमुख्यमंत्री अजित पवारउच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजलसंपदा मंत्री गिरीश महाजनपणनराजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलमहिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरेराज्यमंत्री माधुरी मिसाळविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेखासदार सुनील तटकरेप्रफुल्ल पटेलमाजी मंत्री दिलीप वळसे पाटीलमाजी राज्यमंत्री विद्या ठाकूरविधिमंडळ सदस्यमुख्य सचिव सुजाता सौनिकज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते.



मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेछत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्रशौर्यवीरताचातुर्यअतुलनीय विद्वता जनसामान्यांपर्यंत संपूर्ण देशभर छावा चित्रपटाच्या कलाकार आणि सर्व टीमने पोहोचविली. ११ भाषा अवगत असणारे छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडितकवी आणि लेखकही होते. त्यांच्यावर चरित्रकारांनी अन्याय केलामात्र छावा चित्रपटाने तो दूर झाला.




मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते छावा चित्रपटातील कलाकार संतोष जुवेकर आणि इतर कलाकारप्रोडक्शन टीमचे संजय पाटील यांचे  छावा पुस्तक देवून अभिनंदन करण्यात आले.

अभिनेते संतोष जुवेकर यांनी मनोगत व्यक्त करीत आभार मानले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰