आष्टा : सांगली जिल्ह्यातील आष्टा गावातील प्रसिद्ध संत बाळूमामा देवस्थानच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार मा. जयंतराव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री सद्गुरू संत बाळूमामा देवालयाच्या वतीने आमदार जयंतराव पाटील यांना पेढ्याचा हार घालून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
यावेळी पुजारी बाबासो वाघमोडे , पुजारी निलेश ढेरे व सेवेकरी किरण जगदाळे , संदीप गावडे , उमेश पाटील , आप्पासो जाधव , कुणाल भोसले , राधाताई पांडुरंग थोरात व पांडुरंग थोरात यांच्यासह सर्व बाळूमामा भक्त उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰