सांगली : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित, झील इंटरनॅशनल स्कूल आणि नेहरू युवा केंद्र सांगली, राष्ट्रीय युवा आयोग दिल्ली, तसेच डॉक्टर दिपाली साबगौडा पाटील चॅरिटेबल ट्रस्ट कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सांगता समारोप, बामनोली येथील सुप्रसिद्ध झील इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजीत केले होते.
इयता सातवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी यामध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अर्थ राज्य न्यूज पेपरचे प्रकाशक अल्ताफ खतीब आणि निर्भया पोलीस पथकाचे , मिरज विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीहरी शिंदे आणि त्यांच्या पथकातील सहभागी महिला पोलीस पथक यांनी केले.
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षितता संदर्भातले मार्गदर्शन, प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना कळेल अशा सोप्या भाशेत विशद केले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी एम बर्डे हवालदार आर.एस. कलगुटगी, पोलीस नाईक स्नेहल पाटील झील इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्या मेघाली नरगच्चे, राष्ट्रीय युवा आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत पाटील नेहरू युवा केंद्र सांगली चे जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार, लेखाधिकारी सिद्धार्थ चव्हाण व सहाय्यक सागर व्हनमानेप्रतिनिधी विशाल पाटील, प्रशासकीय अधिकारी अभय भिलवडे कॉर्डिनेटर जावेद नदाफ डॉक्टर दिपाली साबगौडा पाटील चॅरिटेबल ट्रस्ट कुपवाड चे अध्यक्ष आशुतोष पाटील, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्टाफ उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰