भिलवडी ( ता. पलूस) दि. ०३ : भिलवडी गावचे सुपुत्र व सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण शेतकरी सुहास महावीर चौगुले उर्फ लाला यांचे रविवार दि. ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री उशिरा अल्पशा आजारामुळे निधन झाले, ते अंदाजे 55 वर्षाचे होते.
सुहास चौगुले उर्फ लाला हे मनमिळावू व गमतीदार स्वभावाचे होते. त्यांच्या या स्वभावामुळे सर्वजण त्यांना 'लाला' या नावाने ओळखत होते. साधे जिवनमान असलेल्या सुहास चौगुले उर्फ लाला यांची राजकीय वर्तुळात चांगली उठबस होती. ते भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते.
काही दिवसापूर्वी त्यांना कंबर व मनका दुखीचा त्रास सुरू झाला होता. यातच त्यांचे काल रात्री उशिरा दु:खद निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने भिलवडीसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्यावर रविवारी रात्री उशिरा भिलवडी-साखरववाडी येथील स्मशान भुमी येथे अंतिम संस्कार करण्यात आले. व रक्षाविसर्जन विधी सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडला आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰