भिलवडी : ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी सार्वजनिक वाचनालय भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली येथे 62 वा वाचन कट्टा व महिला वाचन कट्टा क्रमांक आठ संपन्न उपक्रम संपन्न झाला.
या वाचन कट्टा उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश चोपडे होते. प्रारंभी कार्यवाहक सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकामध्ये विषय व कार्यवाही बाबतची पद्धती विस्ताराने सांगितली.
यावेळी 13 वाचक सभासदांनी आपण वाचलेल्या पुस्तकांची माहिती या ठिकाणी दिली. कार्यक्रमाचे संयोजन कार्यवाहक सुभाष कवडे , ग्रंथपाल मयुरी नलवडे , सौ विद्या निकम , गजानन माने यांनी केले.
पुढील वाचन कट्टा ०१ मार्च २०२५ रोजी संपन्न होईल यासाठी मी वाचलेले कर्तबगार महिलांच्या विषयीचे पुस्तक हा विषय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आल्याचे कार्यवाहक श्री सुभाष कवडे यांनी सांगितले.
महिला वाचन कट्टा क्रमांक आठ संपन्न
सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे दिनांक एक फेब्रुवारी 2025 रोजी महिला वाचन कट्टा क्रमांक ०८ संपन्न झाला.
यावेळी उपस्थित महिलांनी आपण वाचलेल्या पुस्तकावर उत्तम सादरीकरण केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी महिलांचा हळदीकुंकू समारंभ घेण्यात आला .
यावेळी प्रत्येक महिला सखीला वाण म्हणून पुस्तक भेट देण्यात आले. तसेच वाचन कट्टा सखीनी ग्रंथपाल मयुरी नलवडे सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेच्या ग्रंथपाल पदी निवड झालेबद्दल यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ. साधना जोशी औदुंबर यांनी भूषविले.संयोजन सौ. प्राजक्ता कुलकर्णी व सौ.विद्या निकम यांनी केले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰