सांगली : गेली दोन दिवस काही वर्तमानपत्रात सांगलीचे जिल्हाधिकारी मा. डॉ. राजा दयानिधी यांची बदली करा म्हणुन बातमी झळकत आहे. तसेच व्हॉट्सॲपवर देखील सदर बातमी सारखी पसरवली जात आहे.
सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. डॉ. राजा दयानिधी हे कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यानंतर बरेच कामे मार्गी लावली आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
सर्व सामान्य नागरिक आपले काम घेऊन गेल्यावर जिल्हाधिकारी साहेब तात्काळ चौकशी करून काम मार्गी लावतात. अनुसूचित जाती व जमाती मधील अधिकारी कितीही मोठ्या पदावर असलेतरी 'जात' ही जात नाही.जातीचा चष्मा काढून त्यांच्याकडे पाहिलं जात नाही. मागासवर्गीय समाजातील अधिकारी असल्याने विनाकारण लक्ष करणे सद्या सुरू आहे.
मा. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी संवैधानिक पदावर असून ते सांगली जिल्ह्याचे दंडाधिकारी पण आहेत. त्यांच्या एवढ्या मोठ्या व्यापातून जर त्यांच्याकडून एखादी बैठक पुढे मागे झाली असल्यास त्यासाठी त्यांची बदली मागणे म्हणजे संविधानाचा अपमान केला आहे. या संवैधानिक पदावर विराजमान होण्यासाठी त्यांनी एखादया दलित समाजातून काबाडकष्ट करूनच इथपर्यंत मजल मारलेली आहे,
परंतु सांगली जिल्ह्यातील काही उद्योजकांना दलित समाजातील आधिकऱी पचनी पडत नसल्याने, जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात काही ना काही वक्तव्य करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या संविधानाचा अपमान करीत आहेत.
त्यामुळे गेली दोन दिवस वर्तमानपत्रातून तसेच व्हाट्सॲप वर जे मेसेजेस व बातम्या फिरत आहेत हा जाणून बुजून सांगली जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचा जाणीवपूर्वक अपमान करून त्यांना दलित असल्याचे भासवून देत आहेत. त्यांचा जाणीव पूर्वक पान उतारा करीत आहेत.
यामुळे पुढे आम्ही हे ही जाणून घेण्यास इच्छुक आहोत की आरोप करणारे सदर उद्योजक त्यांच्या कारखान्यामध्ये कोणता कायदा कितपत पाळला जातो की नाही. कामगारांना साधे किमान वेतन, कंत्राटी कामगार कायदा, प्रदूषण कायदा, परप्रांतीय कायदा पाळला जात नाही. उलट मा. जिल्हाधिकारी यांनी यांच्या उद्योगांना या कायद्यातून बगल द्यावी म्हणुन हे उद्योजक दलित अधिकाऱ्यावर
विनाकारण आक्षेप घेऊन त्यांच्या बदलीची मागणी करीत आहेत.
सदर उद्योजक आपल्या कारखान्यामध्ये किती कायदे पाळतात आम्हाला माहीत नाही.
सदर उद्योजकांनी बाबासाहेबांच्या संविधानाचा घोर अपमान केलेला आहे. त्यामुळे संबधित उद्योजकांच्या कारखान्यांमध्ये कायद्याचे पालन केले जाते का..? याची सखोल चौकशी व्हावी व त्यांच्यावर नमुद कायद्या नुसार ॲट्रॉसिटी कायद्याखाली चार दिवसात गुन्हा दाखल व्हावा अन्यथा आम्हाला आ. ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असणारी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली यांच्या वतीने उद्योगपतींच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे 'आमरण उपोषण' करावे लागेल.
मा. जिल्हाधिकाऱ्यांचा अपमान म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान!
याची नोंद व दखल घ्यावी.
असे निवेदन ईमेल द्वारे, मा. राज्यपाल महोदय तसेच मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि मा. पालकमंत्री यांना कळविले आहे.
अशी माहिती मा.संजय कांबळे (जिल्हा संपर्कप्रमुख वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली.) यांनी प्रसिध्दिसाठी ईमेल द्वारे दिली आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰