yuva MAharashtra पालकमंत्री , पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री , वैद्यकीय शिक्षण मंत्री , क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांचा सांगली जिल्हा दौरा

पालकमंत्री , पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री , वैद्यकीय शिक्षण मंत्री , क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांचा सांगली जिल्हा दौरा







पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

      

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणसंसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुक्रवार दि. 31 जानेवारी 2025 रोजीच्या सांगली जिल्हा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

        शुक्रवार दि. 31 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून विटा कडे प्रयाण. सकाळी 8 वाजता विटा येथे आगमन व श्री. अनिल मनोहर बाबर (आप्पा) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ – मातोश्री निवास, जुना वासुंबे रोड, विटा. सकाळी 9 वाजता मा. आ. स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भेट, स्थळ – मायणी रोड, मॉडर्न हायस्कूलसमोर, विटा. सकाळी 9.15 वाजता विटा येथून मिरज कडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता आगमन व श्री अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्स, मिरज यांच्या नुतन नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती, स्थळ – SBGI कॅम्पस टिळक नगर, मिरज. दुपारी 12.15 वाजता पोलीस मुख्यालय कार्यालय, सांगली येथे आगमन व राखीव, स्थळ – पोलीस अधिक्षक कार्यालय, सांगली. दुपारी 1 वाजता सांगली येथून कोल्हापूर कडे प्रयाण.




पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांचा सांगली जिल्हा दौरा

 

            सांगली दि. 30 (जि. मा. का.) : राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई हे शुक्रवार, दि. 31 जानेवारी 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या सुधारीत दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            शुक्रवार, दि. 31 जानेवारी रोजी सकाळी 11.45 वाजता गार्डी, ता. खानापूर येथे आगमन व स्वर्गीय माजी आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रथम पुण्यस्मरण व पुष्पांजली कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ - जीवन प्रबोधनी शैक्षणिक संकुल(पवई टेक), गार्डी. दुपारी 1 वाजता गार्डी येथून आटपाडी, आटपाडी-शेटफळे रोड (गोंदिरा) कडे प्रयाण. दुपारी 2 वाजता आटपाडी, आटपाडी-शेटफळे रोड (गोंदिरा) श्री. विनायकरावजी मासाळ यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत, 2025. दुपारी 2.30 वाजता आटपाडी-शेटफळे रोड (गोंदिरा) येथून दौलतनगर, परळी ता. पाटण कडे प्रयाण.






 
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सांगली जिल्हा दौरा
 
            सांगली दि. 30 (जि. मा. का.) : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार, दि. 31 जानेवारी 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            शुक्रवार, दि. 31 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता श्री. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट, मिरज यांचा उदघाटन समारंभ, स्थळ – एस.बी.जी.आय कॅम्पस, टिळकनगर, मिरज.


 




क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सांगली जिल्हा दौरा

 

        सांगली दि. 30 (जि. मा. का.) : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे हे शुक्रवार दि. 31 जानेवारी 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            शुक्रवार, दि. 31 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता आरेवाडी ता. कवठेमहांकाळ येथे आगमन व श्रीक्षेत्र बिरोबा देवस्थान दर्शन व विकास कामांची पाहणी. सायंकाळी 4.30 वाजता आरेवाडी येथून कोळा, ता. सांगोला, जि. सोलापूर कडे प्रयाण. सायंकाळी 5.15 वाजता आटपाडी, जि. सांगली येथे आगमन व महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.45 वाजता आटपाडी येथून बाळेवाडी, ता. आटपाडी कडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता बाळेवाडी येथे आगमन व नागरी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7.30 वाजता बाळेवाडी येथून भरणेवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे कडे प्रयाण.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰