सांगली : श्रमिक, कष्टकरी, बांधकाम कामगारांच्या अडचणी प्रश्नांबाबत, '२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक सुवर्ण महोत्सवी दिनी' लोकशाही मार्गाने आंदोलन.
भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र सैनिक शहीद झाले, अनेकांना कारावास भोगावा लागला तसेच लाठ्याकाठ्या खाल्लया आहेत म्हणून आज आपण सर्व भारतीय अमृत महोत्सव साजरा करीत आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतीयांना संविधानाद्वारे न्याय, हक्क, अधिकार, स्वतंत्र दिलेले आहे. परंतु ज्या कामगारांनी आपल्या कष्टाच्या जोरावर राष्ट्राची निर्मिती केली आहे. तोच कष्टकरी, कामगार बांधव आजही उपेक्षित आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान जनतेला बहाल करताना म्हणाले होते की हे भारतीय संविधान सर्व मानव जातीसाठी तसेच प्राणीमात्रांसाठी चांगले व खूप उपयोगी आहे. परंतु राज्य चालवत असणारे लायक असले पाहिजे.
हे सद्या स्थितीत लागू होताना दिसत आहे. आज पाहता कष्टकरी कामगारांना गुलामाची वागणूक दिली जाते आहे. भारत देशात फक्त पंचवार्षिक निवडणुकीत निवडून येणाऱ्या राजकीय पक्षांना सत्ता मिळाली आहे. मात्र प्रजाला म्हणावी तशी सत्ता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले नाही हे चित्र स्पष्ट झाले आहे. आपल्या देशात शेतकरी बांधव तसेच कष्टकरी कामगारांना तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते. आता देशाचे सीमेवर रक्षण करणारे सैनिकांना देखील न्याय मागण्यासाठी राज्यकर्त्यांच्या निष्क्रेतेच्या विरोधात आंदोलन करावे लागावे ही बाब शरमेने मान खाली करणार आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कष्टकरी कामगारांच्या हितासाठी राज्यघटनेत कायद्याची तरतूद केली आहे. परंतु सत्ताधारी राज्यकर्ते कायद्याची अंमलबजावणी न करता, प्रशासनाला हाताशी धरून केवळ आपल्या फायद्यासाठी कामगार कायद्यांची मोडतोड करून कामगारांना वेठीस धरून कायदेशीर अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. बांधकाम कामगारांना परिस्थिती खूप वाईट झालेली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या बांधकाम कामगारांच्या हितासाठी हक्काच्या मंडळावर शासकीय सनदी अधिकारी यांची नियुक्ती करावी, सत्ताधारी पक्षाचा मंत्र्याची वर्णी लावल्याने बांधकाम कामगारांच्या हक्काच्या मंडळात राजकीय हस्तक्षेप वाढत चाललेला दिसत आहे. कामगार मंत्री हे या खात्याचे मंत्री असताना त्यांच्याजवळ संपूर्ण महाराष्ट्र राज्याची मोठी जबाबदारी असताना स्वतंत्र असणारे आणि स्वत्वावर चालत असणारे बांधकाम कामगारांच्या हिताचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या अध्यक्ष पदावर कब्जा करून गोरगरीब कष्टकरी बांधकाम कामगारांच्या हक्काची भाकरी हिरावून घेण्याचे घोर पाप हे सत्ताधारी पक्षाचे मंत्रीमहोदय करीत आहेत. तत्कालीन कामगार मंत्री यांनी मंडळाच्या सचिवांना हाताशी धरून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात सेसच्या माध्यमातून जमा असलेला निधी बेहिशेबी खर्च केला आहे. गेले पाच वर्षे पासून खर्चाचे शासकीय ऑडिट केलेले नाही. याचबरोबर जवळपास सहा वर्षांपासून मालक प्रतिनिधी आणि कामगार प्रतिनिधी यांची कायदेशीर नियुक्त नसतानाही मनमानी पद्धतीने खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी विविध ठेका देण्याचे काम केले आहे. उलट बांधकाम कामगारांच्या हितासाठी आजतागायत कोणत्याही धोरणात्मक निर्णय घेतला नाही. मंत्रीमहोदय यांच्या चेले चपटे तसेच सगेसोयरे यांच्या आर्थिक तडजोडीसाठी व्यवस्थितपणे सुरू असणारी मंडळाची वेबसाईट (पोर्टल) बंद करून, मंडळाच्या कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तालुका सुविधा केंद्र या नावाने व्हाइट भ्रष्टाचार हा मंडळाच्या सचिवांनी सुरू केला आहे. सद्या सुविधा केंद्रावर होत असलेली बांधकाम कामगारांची पिळवणूक थांबवावी तसेच तालुका सुविधा केंद्राच्या नांवाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातोय तो खर्च सुविधा केंद्र बंद करून थांबवा. तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे बांधकाम कामगारांच्या हक्काचे वेबसाईट (पोर्टल) पूर्वीप्रमाणे खुली करावी, बांधकाम कामगारांचे कायदेशीर हक्काचे पोर्टल (वेबसाईट) बंद असल्यामुळे इमारत बांधकाम कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. म्हणून आम्ही, आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी कष्टकरी कामगार - कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी निर्माण केलेली संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या वतीने बांधकाम कामगारांना योग्य न्याय मिळावा म्हणून आज २६ 'जानेवारी भारतीय प्रजासत्ताक सुवर्ण महोत्सवी दिनी' खालील प्रमाणे विविध मागण्या आणि तर देशहिताचा मागण्या आपल्याकडे सादर करीत आहोत -
१) भारत देशाच्या रक्षणासाठी लढत असणारे जवान भारतीय सैनिक 'चंदू चव्हाण' आणि इतर जवान सैनिक हे मुंबई येथे आझाद मैदानावर आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करीत आहेत त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना व त्यांना योग्य न्याय देऊन सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सन्मान करण्यात यावा.
२) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या मंडळाचे पद नियुक्त अध्यक्ष हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या मंत्र्याना न करता केवळ क्लास वन दर्जाच्या शासकीय सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून मंडळाचा कारभार पारदर्शक चालविण्यात यावे.
३) सुविधा केंद्र या नावाने मंडळाच्या तिजोरीतून होणारी लूट ताबडतोब थांबवून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे बांधकाम कामगारांच्या हक्काचे असणारे पोर्टल (वेबसाईट) सुरू करावे. अथवा, बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नुतनीकरण आणि लाभाचे अर्ज करण्याचे सर्व अधिकार ट्रेड युनियन ॲक्ट नुसार नोंदणीकृत बांधकाम कामगार संघटनानां तसेच शासन मान्य आपले सेवा केंद्र, CSC सेंटर यांना देण्यात यावेत.
४) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी मान्य केल्या प्रमाणे, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात विविध कामांसाठी काम करण्याकरिता नोंदीत बांधकाम कामगारांच्या सुरक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला तसेच नोंदीत बांधकाम कामगारांच्या विधवा पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरभरती समावेश करावे.
५) मृत्यू वेळ / काळ निश्चित नसल्याने नोंदीत बांधकाम कामगारांना कोणतीही वयाची अट न लावता सरसकट १८ पासून ६० वर्षांपर्यंत बांधकाम कामगाराच्या मृत्यू पश्चात त्यांच्या वारसांना २ लाख रुपये तातडीची मदत म्हणून द्या.
६) नोंदीत बांधकाम कामगारांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या पत्नीला लाभ घेण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट जोडावे तसेच इतर जाचक अटी रद्द करून सोईस्करपणे लाभ द्या.
७) बांधकाम कामगारांचे वृद्धापकाळ , व्याधी व इतर आवश्यक खर्चा करीता बांधकाम कामगारांना वयाच्या ६० वर्षा नंतर, मासिक ५०००/- रूपये पेन्शन योजना लागू करा.
८) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय सुरू करून ते काम पाहण्यासाठी, प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांची नियुक्ती करून मंडळाचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालवा.
९) बांधकाम कामगारांच्या उच्च शिक्षित मुलांचा बुद्धीमत्ता व सार्वजनिक विकास होण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र व वाचनालय जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू करा.
१०) नोंदीत बांधकाम कामगारांसाठी, ग्रामीण आवास (घरकुल) योजना प्रमाणे शहरी आवास (घरकुल) योजना सुरू करा.
११) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे अध्यक्ष आणि सचिव यांनी मंडळाच्या शिल्लक निधीचा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी तसेच त्यांची दिवसांन दिवस वाढत चाललेला संपत्ती चौकशी 'ईडी' मार्फत करावी व तशी नोंद त्यांच्या सेवापुस्तकात घ्यावी.
तरी वरील प्रमाणे सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर लोकशाही मार्गाने तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल.
यांची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे , जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे,
कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष
किशोर आढाव, जिल्हा कोषाध्यक्ष हिरामण भगत, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष रूपेश तामगावकर, सांमिकु मनपा क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे,
सांगली शहर अध्यक्ष
संगाप्पा शिंदे,मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार, कुपवाड शहर अध्यक्ष
बंदेनवाज राजरतन, जयकर काळे, विशाल कांबळे, दिपक कांबळे, सहदेव कांबळे, मऱ्याप्पा राजरत, प्रदिप मनचंद, संदिप कांबळे, विक्रांत गायकवाड, रेखाताई अवघडे, यासुक मुजावर, सागर कांबळे, मल्हारी यादव, प्रेमगीत कांबळे, श्रीमंत यादव, चंद्रकांत कांबळे, जावेद आलासे, आसलम मुल्ला, अशोक माळी, विष्णू वाघमारे, सुभाष पाटील, भगवंत पाटील, बाळासाहेब हेळवी, कल्लाप्पा बिरडे, राजीव व्हणानावर, परशुराम बनसोडे, सतिश वाघमारे यांच्या बरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰