सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : ज्या पक्षकारांना मुद्रांक विक्रेत्यांनी मुद्रांकाच्या किंमती व्यतिरीक्त जास्तीचे शुल्क आकारले असल्याची तक्रार असेल, त्यांनी तात्काळ संबंधित तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे जिरंगे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
तसेच, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, 1 जुलै 2004, महसूल व वन विभाग व महसूल व वन विभाग मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन आदेशात निश्चित केलेल्या नियमांचे पालन करण्यात यावे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
सांगली जिल्ह्यातील एकूण 13 दुय्यम निबंधक कार्यालयांच्या अधिपत्याखाली मुद्रांक विक्रेते कार्यरत आहेत. या मुद्रांक विक्रेत्यांमार्फत मुद्रांक पुरवठा वेळेवर व योग्य दरात उपलब्ध करून दिला जातो. तथापि, काही नागरिक व पक्षकारांकडून वरिष्ठ कार्यालयाकडे वेळेवर मुद्रांक न मिळणे तसेच मुद्रांक शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारली जाण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने तक्रारीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महसूल व वन विभाग मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन आदेश प्रख्यापित केला आहे. या आदेशानुसार, विविध अनुच्छेदांवरील मुद्रांक शुल्कात बदल करण्यात आला आहे. पूर्वी 100 रुपये किंवा 200 रुपये निश्चित मुद्रांक शुल्क असलेल्या अनुच्छेदांमध्ये आता 500 रूपये इतकी वाढ केली आहे. यामध्ये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील अनुच्छेद क्रमांक 4, 5 (ह) (ब), 8, 9, 10, 12, 27, 30, 38, 44, 47 (1) (ब), 41, 50, 52 (अ), 58 (अ) यांचा समावेश आहे.
मुद्रांक विक्रेते यांच्याकडे 100 रूपये व 200 रूपये मूल्याचे मुद्रांक साठा उपलब्ध असेल, तर पक्षकारांच्या मागणीनुसार त्याचा पुरवठा केला जाईल, तथापि, दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या, शासन आदेशानुसार, संबंधित अनुच्छेदांमध्ये रक्कम 100 रूपये, 200 रूपये या ऐवजी किमान 500 रूपये इतक्या मूल्याच्या मुद्रांकाचा वापर करणे बंधनकारक आहे याची पक्षकारांनी कृपया नोंद घ्यावी. सर्व पक्षकारांनी शासन आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुद्रांक मुद्रांक 2004/1636/प्र.क्र. 436/म-1.-मुंबई मुद्रांक अधिनियम, 1958 (1958 चा मुंबई 60) याच्या कलम 1 च्या खंड (अ) अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, 1 जुलै 2004, महसूल व वन विभाग या परिपत्रकात जात प्रमाणपत्र/उत्पन्न प्रमाणपत्र/वास्तव्य प्रमाणपत्र/राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांच्याकडे दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवर उक्त अधिनियमाच्या अनुसूची 1 मधील अनुच्छेद 4 अन्वये आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी करणबाबत शासनकडून संबंधित आस्थापना यांना यापूर्वीच सूचित केले आहे. सबब न्यायालय व शासकीय कार्यालये यांच्यासमोर दाखल करावयाचे प्रतिज्ञापत्रावर कोणत्याही मुद्रांकांची आवश्यकता नाही याची पक्षकाराने नोंद घ्यावी.
पक्षकारांना त्यांच्या सोयीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये त्यांचा पत्ता व संपर्क तपशील अनुक्रमे पुढीलप्रमाणे. (1) सह दुय्यम निबंधक वर्ग-2, मिरज क्र. 1, सांगली, राजवाडा कंपाउंड, सांगली, hqsrmiraj@gmail.com. (2) सह दुय्यम निबंधक वर्ग-2, मिरज क्र. 2, मिरज, तहसील कार्यालय आवार, मिरज, sromiraj2@gmail.com. (3) सह दुय्यम निबंधक वर्ग-2, मिरज क्र. 3, कुपवाड, निलशिलबिल्डिंग, महानगरपालिका रोड, कुपवाड, kupwad.111@gmail.com. (4) सह दुय्यम निबंधक वर्ग-2, वाळवा-इस्लामपूर, नवीन तहसील कार्यालय आवार, इस्लामपूर, sroislampur0123@gmail.com, (5) दुय्यम निबंधक श्रेणी-1, तासगाव, मध्यवर्ती प्रशासकीय तहसील कार्यालय आवार, तासगाव, srotasgaon5@gmail.com. (6) दुय्यम निबंधक श्रेणी-1, खानापूर विटा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विटा, srovita@gmail.com. (7) दुय्यम निबंधक श्रेणी-1, जत, तहसील कार्यालय आवार, जत, srojat2@gmail.com (8) दुय्यम निबंधक श्रेणी-1, कवठेमहांकाळ, तहसील कार्यालय आवार, कवठेमहांकाळ, srokms@gmail.com. (9) दुय्यम निबंधक श्रेणी-1, आटपाडी, तहसील कार्यालय आवार, आटपाडी, sroatpadi@gmail.com. (10) दुय्यम निबंधक श्रेणी-1, कडेगाव, तहसील कार्यालय आवार, कडेगाव, srokadegaon02@gmail.com. (11) दुय्यम निबंधक श्रेणी-1, शिराळा, तहसील कार्यालय आवार, शिराळा, sroshirala@gmail.com. (12) दुय्यम निबंधक श्रेणी-1, पलूस, पंचायत समितीजवळ, पलूस, sropalus@gmail.com. (13) दुय्यम निबंधक श्रेणी-1, आष्टा, जानकी मंगल धाम, बिरोबा मंदिराजवळ, आष्टा, srashtaoffice@gmail.com.
पक्षकारांनी मुद्रांक विक्री व शुल्कासंदर्भात कोणत्याही अडचणी किंवा तक्रारी असल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा. शासन आदेशानुसार मुद्रांक मुद्रांक 2004/1636/प्र.क्र. 436/म-1.-मुंबई मुद्रांक अधिनियम, 1958 (1958 चा मुंबई 60) याच्या कलम 1 च्या खंड (अ) अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, 1 जुलै 2004, महसूल व वन विभाग व महसूल व वन विभाग मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन आदेशात निश्चित केलेल्या नियमांचे पालन करण्यात यावे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰