भिलवडी (ता. पलूस) : कडेगांव मतदारसंघातील भिलवडी हे अतिशय महत्त्वाचे गाव आहे, मोठे आहे. येथील जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे भिलवडीच्या विकासासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. असे आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी सांगितले.
येथील बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधकामासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते या कामाचे भूमिपूजन डॉ.कदम यांनी केले.
यावेळी ते बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, सांगली कारखान्याचे संचालक राजूदादा पाटील, सरपंच सीमा शेटे व ग्रामपंचायतीचे सर्व सद्स्य उपस्थित होते.
डॉ.विश्वजीत कदम यांचा काठी आणि घोंगडी देऊन पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला.
दरम्यान यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त दर्शन घेतले. तसेच साखरवाडी येथील हजरत पीर मदनशाह वली उरूसानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट दिली.
यावेळी युवा नेते पृथ्वीराज पाटील, प्रतिक संग्राम पाटील, विजयकुमार चोपडे, सतीश पाटील, बाळासाहेब मोहिते, जावेद तांबोळी, पांडुरंग टकले, बाळासाहेब मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰