yuva MAharashtra सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय? वाफ घेताना गरम पाण्यात टाका ४ चमचाभर हे मिश्रण, नाक होईल मोकळं....

सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय? वाफ घेताना गरम पाण्यात टाका ४ चमचाभर हे मिश्रण, नाक होईल मोकळं....




सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय? वाफ घेताना गरम पाण्यात टाका ४ चमचाभर हे मिश्रण, नाक होईल मोकळं.....

सध्या थंडीचे दिवस सुरु असल्याकारणाने वातावरणातला गारठा वाढत जात आहे. या वाढणाऱ्या थंडीच्या पाऱ्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. जशी थंडी वाढते तसे घरातील लहान ते थोरांपर्यंत कुणाला न कुणाला सर्दी, खोकला, ताप येतोच. या अशा छोट्याश्या आजारांसाठी आपण डॉक्टरकडे जाणे टाळतो आणि घरीच काहीतरी उपाय करतो. या उपायांपैकी एक सोपा आणि सगळ्यांच्या घरी केला जाणारा उपाय म्हणजे गरम पाण्याची वाफ घेणे. सर्दी, खोकला, ताप, घसा बसणे यांसारख्या आजारांवर आपण पहिला घरगुती उपाय म्हणून आपण नुसत्याच गरम पाण्याची वाफ घेतो. परंतु असे न करता घरच्या घरी आपण एक सोपा उपाय करू शकतो. नक्की हा उपाय काय आहे हे समजून घेऊयात

साहित्य...

१.) तुळशीच्या पानांची पावडर - १ टेबलस्पून,
२.) दालचिनीची पावडर - १ टेबलस्पून,
३.) लवंगांची पावडर - १ टेबलस्पून,
४.) काळीमिरीची पूड - १ टेबलस्पून.

नैसर्गिक गोष्टींचा वापर करून सुद्धा आपण  सर्दी, खोकला, ताप चटकन पळवू शकतो.

कृती...

१. सर्वप्रथम एका भांड्यात वाफ येईपर्यंत गरम पाणी उकळवून घ्या.
 
२. मग गॅस बंद करून हे पाणी गॅसवरून खाली उतरवून घ्या.

३. एका स्वच्छ सुती कापडावर तुळशीच्या पानांची पावडर, दालचिनीची पावडर, लवंगांची पावडर, काळीमिरीची पूड या सगळ्या पावडर एक टेबलस्पून घ्याव्यात.

४. त्यानंतर या पावडर कापडात घेऊन त्यांना गाठ मारून त्याची एक छोटीशी पोटली तयार करावी.

५. ही छोटीशी पोटली या गरम वाफाळत्या पाण्यात सोडावी.

६. वाफाळत्या पाण्यात ही पोटली सोडल्याने ती पावडर पाण्यात मिसळून त्याची जी वाफ येईल ती घ्यावी.

७. अशी वाफ घेतल्याने तुळस, दालचिनी, लवंग, काळीमिरी या घटकांमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे तुमचा सर्दी, खोकला, ताप, घसा बसणे यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

संकलन-

निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰