yuva MAharashtra पालकांचे वर्तन मुलांसाठी आदर्श संस्कारपाठ आहे - डॉ.सचिन कापसे; भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत व्याख्यान

पालकांचे वर्तन मुलांसाठी आदर्श संस्कारपाठ आहे - डॉ.सचिन कापसे; भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत व्याख्यान




भिलवडी ( ता. पलूस )  : मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता, शांतता,चारित्र्य, पावित्र्य,सातत्य ही पंचसूत्री मुलांना शिकवा.पालकांचे आचरण व वर्तन हे मुलांसाठी आदर्श संस्कारपाठ असते.मुलांच्या मनातील भिती नाहीशी करण्यासाठी वेळेनुसार  त्यांचे मित्र बनून संवाद साधण्याची कला अवगत करा.असे प्रतिपादन डॉ.सचिन कापसे यांनी केले.


भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी यांच्या वतीने पालकांसाठी आयोजित "१ ते १६ वयोगटातील बालकांचे आरोग्य संगोपन व संस्कार" या विषयावरील व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे होते.


यावेळी नेताजी स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीचे संस्थापक प्रा.अनिल फाळके, भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुरू आणि पालक यांच्या समन्वयातून मुलांचे व्यक्तिमत्व आकारास येईल असे प्रतिपादन महावीर वठारे यांनी केले.



मातृभाषेवरील प्रभुत्व व वेळेचा नेमकेपणा स्पर्धा परीक्षेतील यशासाठी महत्वाचा असल्याचे मनोगत प्रा.अनिल फाळके यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ.सचिन कापसे यांनी पालकांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे समाधान केले.
प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी केले. पाहुणे परिचय यांनी संजय पाटील यांना केला. सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केले. आभार सौ. संध्याराणी मोरे यांनी मानले. 
यावेळी प्रगती भोसले,विठ्ठल खुटाण, अर्चना येसुगडे, प्रियंका आंबोळे,सारिका कांबळे,मेघना शेटे,विद्या नाईक,अर्चना मोकाशी आदींसह पालक उपस्थित होते.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰