सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य सन 2024-25 अंतर्गत दिनांक 10 ते 14 जानेवारी 2025 या कालावधीत पाच दिवसीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कृषि महोत्सव शांतीनिकेतन मैदान, वसंतदादा साखर कारखाना, माधवनगर रोड, सांगली येथे होणार असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकरी व जनतेने घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या अनुषंगाने बाजरी, ज्वारी, रागी, राळा, नाचणी इत्यादी पौष्टिक तृणधान्याचा आहारातील समावेश वाढावा तसेच या तृणधान्य पिकांच्या क्षेत्र व उत्पादन वाढीसाठी चालना देण्याचे काम कृषि विभागाकडून सुरु आहे. याचा एक भाग म्हणून दिनांक 10 ते 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 9 या वेळेत कृषि खात्यामार्फत जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये तृणधान्य पिकांचे जिवंत नमुने, प्रक्रियायुक्त पदार्थ, प्रक्रियेसाठी लागणारी यंत्र सामुग्री, धान्यविक्री, तसेच पाककृती पाहण्यास व खरेदी करण्यास मिळणार आहे. तसेच या महोत्सवामध्ये कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्र, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषि संलग्न महाविद्यालये सहभागी होत असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
𝗟𝗶𝗻𝗸𝘀
YouTube Channel
🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707
News Portal
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰