कुंडल (ता. पलूस) : येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यात सन २०२४-२५ चा २३ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन शरद लाड यांच्या उपस्थितीत तसेच येडे (उपाळे) चे प्रगतशील शेतकरी संभाजी बाबर आणि त्यांच्या पत्नी यांचे हस्ते मोळीपूजन करण्यात आले.
चेअरमन शरद लाड म्हणाले, गतवर्षी कारखान्याने ऊसाला इतर कारखान्यांच्या बरोबरीनेच उच्चांगी दर दिला होता; याही वर्षी वरचढ दर देण्याचे काम केले जाईल. शासनाने खाजगी व सहकारी साखर कारखान्यांना वेगवेगळे नियम लागू केले आहेत, त्यामुळं सहकारी कारखादारीवरील समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असूनही शेतकरी-सभासदांच्या पाठबळाने अधिक जोमाने यंदाचा गळीत हंगाम पार पडेल, ही खात्री आहे.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन दिगंबर पाटील, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, सेक्रेटरी, वीरेंद्र देशमुख त्याचबरोबर आजी-माजी संचालक व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰