yuva MAharashtra विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 : मतदान केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 : मतदान केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश जारी



 

सांगली, दि. 18 (माध्यम कक्ष) : सांगली जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे मतदान दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, शांतता रहावी, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या इमारतीपासून 200 मीटर सभोवतालच्या परिसरात पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.

आदेशात म्हटले आहे, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटागटाने फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे. झेरॉक्स मशीन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा वापर करण्यास मनाई केली आहे. मतदान केंद्रात मोबाईल, पेजर वापरण्यास मनाई केली आहे.

हा आदेश निवडणूक कर्तव्य बजावीत असणाऱ्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना लागू असणार नाही. हा आदेश 20 नोव्हेंबर 2024 रोजीचे सकाळी 6 वाजल्यापासून ते संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰