सांगली दि. 16 : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन,सांगली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की,
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात जो मनमानी गैर कारभार, मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीने आवाज उठवून पाठपुरावा सुरू आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात विविध योजनांचा लाभ शासनाकडे जमा झालेल्या 1 टक्के सेस मधून श्रमिक, कष्टकरी, बांधकाम कामगारांना दिला जातोय. परंतु सद्या बोगस लोकांची नोंदणी करून खऱ्या बांधकाम कामगारांचा हक्क हिसकावून, तोंडचा घास पळवून घेतला जातोय,
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई. यांच्या कार्यकारिणी मध्ये फक्त अध्यक्ष म्हणजेच राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे तसेच सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विवेक कुंभार यांच्या संगनमताने मनमानी पद्धतीने भ्रष्ट कारभार सुरू आहे.
वास्तविक पाहता मंडळात बांधकाम प्रतिनिधी आणि मालक प्रतिनिधी यांची नियुक्ती असणे आवश्यक असते परंतु गेले पाच वर्षांपासून मालक प्रतिनिधी आणि कामगार प्रतिनिधी यांची मंडळात नियुक्ती केली नाही. मंत्री महोदयांनी मंडळाचा पदभार घेतल्यापासून आजतागायत बांधकाम क्षेत्रातील कष्टकरी कामगारांच्या साठी कोणताही नवीन धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यांनी फक्त नोंदणीची वार्षिक फी फक्त 1 /- रूपये करून आपल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर शासकीय यंत्रणा हाताशी धरून सरपंच, ग्रामसेवक यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात बोगस नोंदणी सुरु केली आहे. आणि तालुका निहाय सुविधा केंद्र सुरू करून आपल्या विधानसभा मतदारसंघांतील त्यांच्या मर्जीतील लोकांनाच पोसण्यासाठी मंडळात भरणा सुरू केला आहे.
तसेच त्रयस्थ व्यक्तीकडून खाजगी पद्धतीने कामगार भरती करून स्वता:चीच 'एस टू' खाजगी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात बाह्य मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी ठेका घेवून मिरज तालुका त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सगे सोयरे यांना कामाला घेतले आहे. विविध योजनांचे ठेका घेवून मंडळाच्या शिल्लक निधीला मोठ्या प्रमाणावर खोरा लावण्याचा उद्योग सुरू केलाला आहे. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या शिष्टमंडळाची विवेक कुंभार सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १५/०७/२०२४ रोजी, मुंबई येथे झालेल्या बैठकीत बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित, बेरोजगार मुलांना अथवा त्यांच्या पत्नीला शैक्षणिक पात्रते नुसार कायमस्वरूपी किंवा मानधन तत्त्वावर बांधकाम कामगार तालुका निहाय होणाऱ्या कार्यालयात मंडळाच्या कामासाठी नोकरीत सामावून घेतले जाईल असे सभागृहात मान्य केले व तशी टिप्पणी आपल्या रजिस्टर वहीत नोंद करून घेतली आहे. तसे लेखी पत्र त्यांनी दि. १५/०७/२०२४ रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त दि. ०४/०९/२०२४ नुसार कळविले आहे. असे असतानाही खरे बांधकाम क्षेत्रात काम करीत असणाऱ्या कामगारांची मुले पात्र असतानाही त्यांना डावलून मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांचा फायद्यासाठी आर्थिक तडजोड करून बोगस नोकर भरती केली आहे. याचबरोबर विभागीय कामगार आयुक्त व अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी, भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी, आमदार यांची यादी पावून त्यांनी, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सहाय्यक आयुक्त व कामगार अधिकाऱ्यांना एक फतवा काढला आहे
'भाजप पक्षाच्या मान्यवरांच्या लेटरहेड वरून शिफारस आल्यासचं बांधकाम कामगारांचे कॅंम्प लावण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन करण्याचे धाडस कोणत्याही अधिकाऱ्यांने दाखवू नये अन्यथा होणाऱ्या परिणामास ते स्वत: जबाबदार राहातील याची गंभीर नोंद घ्यावी'
असे धमकी वजा आदेश व्हाट्सअप वरून दिले आहेत. वास्तविक पाहता शासकीय कोणताच अधिकारी कोणा एका पक्षाचा बांधिलकी नसतो . त्यांची बांधिलकी जनतेशी असते तो जनतेचा सेवक म्हणून आपले कार्य करणे आवश्यक असते. परंतु तसे होताना दिसत नाही. कामगार विभागाच्या अधिकारी सुध्दा खऱ्या बांधकाम कामगारांच्या न्यायाची बाजू घेत नाहीत ते कामगार मंत्री यांच्या हाताचे बाहुले बनलेले आहेत. कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी आपल्या कर्तृत्वात कसूर करीत आहेत ते आपल्या पेक्षा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना बेकायदेशीर पद्धतीने कारभार करण्यासाठी भाग पाडत आहेत. अधिकारी सुध्दा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी बेकायदेशीर कारभारात नकळत अडकत आहेत. मिरज विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात घर ते घर बोगस नोंदणी करून त्यांना ताबडतोब भांडी संच तसेच इतर आर्थिक लाभ देत आहेत मात्र खऱ्या बांधकाम कामगारांना वरचेवर कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात आपल्या हाडांची काडी होईपर्यंत वारंवार फेऱ्या मारावे लागत आहेत. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी हे बांधकाम कामगारांच्यावर मेहरबानी करत आहेत अशी वागणूक देत आहेत. बांधकाम कामगार हा खरा हकदार असतानाही त्यांना आपल्या हक्काच्या कल्याणकारी योजनांच्या पासून वंचित राहावे लागत आहे. निष्कारण अन्याय सहन करावा लागत आहे. अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला असल्याने त्यांनी आजतागायत केलेल्या कामाची चौकशी करून त्यांना निलंबित करावे ते त्या पदावर कार्यरत राहण्यास लायक नाहीत. तसेच त्यांच्या व्हाट्सअप वरून दिलेल्या आदेशामुळे असे दिसते की, सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय हे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी नसून ते कामगार मंत्री आणि भाजप पक्षाच्या कल्याणासाठी आहे. मंत्री महोदयांच्या हाताची कटपुतळी बनले आहेत. त्यामुळे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाला सोमवार दिनांक २३/०९/२०२४ रोजी कार्यालयीन वेळेत टाळे ठोकण्यात येईल. असा इशारा, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे म्हणाले की,
यावर कामगार कार्यालयात सुधारणा झाली नसल्यास सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नोंदीत बांधकाम कामगारांना एकत्र करून, मिरज तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामगार मंत्री सुरेश खाडे यांना मतांचा फायदा व्हावा यासाठी मिरज तालुक्यातील सरपंच यांनी ग्रामसेवकाला हाताशी धरून बोगस लोकांची नोंदणी केली आहे तसेच काम न करता जाग्यावरच ९० दिवस काम केले असल्याचा सही शिक्का दाखले देण्यासाठी इंजिनिअर उपलब्ध करून मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदणी केली आहे त्या बोगस नोंदणीला जबाबदार असणारे, सरपंच, ग्रामसेवक, शासकीय अधिकारी, इंजिनीयर आणि बोगस नोंदणी धारक यांची चौकशी करून कायदेशीर गुन्हा दाखल करावा याचबरोबर, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात अध्यक्ष म्हणजेच कामगार मंत्री आणि सचिव यांनी आपल्या मनमानी कारभार पद्धतीने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे त्यांची 'इडी' मार्फत चौकशी करावी या मागणी साठी आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, मुंबई येथे आझाद मैदानावर पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने व्यापक आंदोलन सुरू केले जाणार आहे अशी माहिती दि. १५/०९/२०२५ रोजी पत्रकार बैठकीत पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे यांनी दिली आहे.
यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे,जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे,जिल्हा महासचिव अनिल मोरे,कोषाध्यक्ष हिरामण भगत, मनपा अध्यक्ष युवराज कांबळे, सांगली शहर अध्यक्ष संगाप्पा शिंदे, मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, जयकर काळे, यांच्या बरोबर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖