भिलवडी दि. 14 : गणेशमूर्तीसोबत लोक मोठ्या प्रमाणात निर्माल्यही नदीत विसर्जित करायचे. परंतु निवास गुरव यांच्या पुढाकारामुळे लोकांना आता नदीत 'निर्माल्य' विसर्जित केल्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांची जाणीव झाली आहे.
भिलवडी- भुनेश्वरीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते निवास गुरव व त्यांच्या सहकार्यांनी गुरुवारी भुनेश्वरीवाडी येथे गणपती गौरी विसर्जन निर्माल्य संकलन मोहिम राबविली. या मोहिमेला सर्रास गणेशभक्तांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. यावर्षी या मोहिमेत मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा झाले. या मोहिमेचा दृष्टिकोन स्पष्ट करताना, निवास गुरव म्हणाले की, यापूर्वी लोक 'निर्माल्य' प्रचंड मोठ्या प्रमाणात नदी पात्रात सोडत होते. त्यामुळे नदिचे पाणी दुषीत होऊन याचा परीणाम नदी पात्रातील जलचर प्राण्यासह नदीकाठच्या लोकांच्या आरोग्यावर व शेतीवर देखील होत होता. जमा झालेले निर्माल्य कंपोस्टिंगसाठी भिलवडी ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केले जाते, जे शेतक-यांमध्ये वितरीत केले जाते. या मोहिमे अंतर्गत शेतकऱ्यांची सेवा करताना खूप आनंद होत असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
निवास गुरव हे उत्कृष्ट खेळाडू , कबड्डीचे प्रशिक्षक व पंच आहेत. त्यांना सामाजिक कार्याबद्दल समाज भूषण पुरस्कार मिळाला आहे. ते त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा वाढदिवस वृक्षा रोपण, वृध्दाश्रम , आणाथ आश्रमांना आर्थिक मदत करून साजरा करतात.
या उपक्रमामध्ये निवास गुरव यांच्यासह संतोष गुरव, ललित कणसे, ललित गुरव, विलास गुरव,भुवन गुरव, पवन गुरव, शशिकांत गुरव, अर्जुन गुरव,मयूर गुरव,स्वप्नील गुरव व सर्व ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला होता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖