BANNER

The Janshakti News

प्रारूप मतदार यादी प्रसिध्द ; मतदारयादीत नाव असल्याची मतदारांनी खात्री करावी - जिल्हाधिकारी




        सांगली दि. 6 (जि.मा.का.) : भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विचारात घेऊन दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत आज प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या मतदार यादीत आपले नाव असल्याची मतदारांनी खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

            प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण 24 लाख 54 हजार 377 मतदार असून यामध्ये पुरूष मतदार 12 लाख 50 हजार 756, स्त्री मतदार 12 लाख 3 हजार 487 व तृतीयपंथी मतदार 134 आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार  पुढीलप्रमाणे.  281-मिरज - पुरूष-1 लाख 67 हजार 92, स्त्री - 1 लाख 63 हजार 848, तृतीयपंथी - 26, एकूण 3 लाख 30 हजार 966.  282-सांगली -  पुरूष-1 लाख 72 हजार 542, स्त्री - 1 लाख 70 हजार 542, तृतीयपंथी - 68, एकूण 3 लाख 43 हजार 152. 283- इस्लामपूर - पुरूष-1 लाख 38 हजार 331, स्त्री - 1 लाख 33 हजार 950, तृतीयपंथी – 4, एकूण 2 लाख 72 हजार 285. 284-शिराळा - पुरूष-1 लाख 52 हजार 779, स्त्री - 1 लाख 45 हजार 239, तृतीयपंथी – 3, एकूण 2 लाख 98 हजार 21. 285-पलूस-कडेगाव - पुरूष-1 लाख 43 हजार 264, स्त्री - 1 लाख 41 हजार 885, तृतीयपंथी – 8, एकूण 2 लाख 85 हजार 157. 286-खानापूर - पुरूष-1 लाख 72 हजार 436, स्त्री - 1 लाख 65 हजार 863, तृतीयपंथी – 18, एकूण 3 लाख 38 हजार 317. 287-तासगाव-कवठेमहांकाळ - पुरूष-1 लाख 54 हजार 864, स्त्री - 1 लाख 47 हजार 909, तृतीयपंथी – 3, एकूण 3 लाख 2 हजार 776. 288-जत - पुरूष-1 लाख 49 हजार 448, स्त्री - 1 लाख 34 हजार 251, तृतीयपंथी – 4, एकूण 2 लाख 83 हजार 703.

            प्रारूप मतदार यादी सर्व तहसिल कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये तसेच  ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रारूप मतदार यादीबाबत दावे व हरकती असल्यास 6 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नोंदवाव्यात. मतदार यादीत नाव नसेल तर मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नमुना 6 मध्ये अर्ज करावा. प्रारुप मतदार यादीमधील नावांबाबत आक्षेप नोंदविण्यास अथवा नाव कमी करण्यासाठी नमुना 7 मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील मतदारांच्या तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी, एकाच मतदारसंघात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाल्यास, मतदान ओळखपत्र बदलून मिळण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना चिन्हांकित करणे इत्यादीकरीता नमुना 8 मध्ये  अर्ज करता येईल.  Voter Portal, Voter Helpline App या ऑनलाईन पध्दतीचा वापर करुन मतदार स्वत: नोंदणी / वगळणी / स्थलांतरण / दुरुस्ती इत्यादी करु शकतात.

            जिल्ह्यात मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण करण्यात आले असून त्यामध्ये मतदान केंद्रांच्या नावात बदल-50, ठिकाणात बदल-137, विलिनीकरण-99 व नविन मतदान केंद्र-61 स्थापन करण्यात आली असून सद्यस्थितीत 2 हजार 482 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये 281-मिरज विधानसभा मतदारसंघात 307, 282-सांगली – 315, 283-इस्लामपूर - 290, 284-शिराळा - 334, 285-पलूस-कडेगाव - 285, 286-खानापूर - 356, 287-तासगाव-कवठेमहांकाळ - 308 व जत विधानसभा मतदारसंघात 287 मतदान केंद्रे आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖