BANNER

The Janshakti News

दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यात खरे सुख - शरद जाधव; जायंटस् ग्रुप ऑफ सहेली भिलवडी यांच्या वतीने महिलांसाठी व्याख्यान




                          


                        व्हिडीओ



भिलवडी दि. १४ : जीवनातील साध्यापेक्षा साधनाच्या पाठीमागे धावताना माणूस सर्वाधिक दुःखी बनत आहे.खरे सुख हे दुःखितांचे अश्रू पुसून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यात असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व हास्ययात्राकार शरद जाधव यांनी केले.  जायंटस् ग्रुप ऑफ सहेली भिलवडी (ता. पलूस)यांच्या वतीने जानकी चितळे हॉल भिलवडी येथे महिलांसाठी आयोजित 'सुख म्हणजे नक्की काय असतं! या विषयावरील व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.




अध्यक्षस्थानी डॉ.सौ.भाग्यश्री कुलकर्णी होत्या.प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर व सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


यापुढे बोलताना शरद जाधव म्हणाले की,अपेक्षांचे ओझे वाढल्यामुळे माणूस खऱ्या सुखपासून वंचित आहे.जीवनात पैसा हे साधन आहे तर मनाचे सुख हे साध्य  आहे.मोबाईलने एका बाजूने जग आपल्या मुठीत आणले पण आपुलकीचा,प्रेमाचा संवादच हरपल्याने माणसे परस्परांपासून दूर चालली.दुःख उगळीत न बसता ते विसरून मनाच्या कोपऱ्यात आनंद आणि सकारात्मक गोष्टी,समाधान कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याचे कौशल्य अनुभवातून आत्मसात करा.सयंम,समाधान आणि कर्मकुशलतेवर उभारलेल्या भारतीय संस्कृतीशी जोडलेली नाळ तुटून देऊ नका.सुख म्हणजे मानवाच्या आंतर आत्म्याला लाभलेले समाधान आहे.


प्रास्ताविक व स्वागत यांनी केले.सौ. शेडबाळे यांनी सूत्रसंचालन केले.यांनी आभार मानले.यावेळी जायंटस् ग्रुप ऑफ सहेलीच्या अध्यक्षा सौ.स्मिता वाळवेकर, उपाध्यक्षा सौ.उज्वला परीट,सौ.स्नेहा शेडबाळकर,कार्यवाह सौ.अमृता चौगुले,खजिनदार सौ.चैत्राली कुलकर्णी,सौ.सीमा शेटे,सौ.उमा कोरे,सौ.अनिता गुरव आदींसह सर्व सदस्या,महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.




 भिलवडी येथील व्याख्यान प्रसंगी बोलताना शरद जाधव,बाजूस डॉ.भाग्यश्री कुलकर्णी,स्मिता वाळवेकर,उज्वला परीट,उमा कोरे,अनिता गुरव आदी मान्यवर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖