BANNER

The Janshakti News

पलूस तालुक्यात चालू असलेल्या चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने ; मा. सचिन थोरबोले (विभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली अंकलखोप येथे बैठक संपन्न..




 
भिलवडी दि. 17 : भिलवडी पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीच्या, घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी  मा. सचिन थोरबोले उपविभागीय पोलिस अधिकारी तासगाव विभाग तासगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी अंकलखोप ता. पलूस येथे बैठक संपन्न झाली.
 या बैठकीसाठी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे , पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावातील पोलीस पाटील , सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , तंटामुक्ती अध्यक्ष , पत्रकार व नागरिक उपस्थित होते. 


  सर्व गावातील नागरिकांनी रोज गस्त घालनेबाबत व गस्त कशी करावी ह्या बाबत सूचना देण्यात आल्या.



   तसेच मालमत्तेची सुरक्षा कशी करावी, चोरीच्या व घरफोडीच्या घटनांना आळा कसा घालावा तसेच सायबर गुन्ह्यापासून कसे सुरक्षित राहावे , प्रत्येक गावातील पोलीस पाटील व सरपंच यांना सोबत घेऊन कायमस्वरूपीचे ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात येणार आहे. सोशल मीडियातून कोणीही अफवा पसरवू नयेत, नागरिकांनी अफवा वरती विश्वास ठेवू नये , गावामध्ये कोणतीही अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्याला मारहाण न करता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा यासह अनेक विषयाबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी मा. सचिन थोरबोले ह्यांनी उपस्थित सर्व पोलीस पाटील , सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यासह  उपस्थीत नागरिकांना व युवकांना मार्गदर्शन केले.
 
  दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी उपस्थित नागरिकांच्या तक्रारी आणि समस्यांचे निवारण केले. तसेच अफवा वरती विश्वास न ठेवता चोरीच्या व घरफोडीच्या  घटनांना आळा घालण्यासाठी व चोरट्यांना पकडण्यासाठी सर्व नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

 कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक दीपक पाटील यांनी केले तर आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी मानले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖