सांगली दि. १७ : ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली, श्रमिक कष्टकरी कामगार कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या शिष्टमंडळाला, सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई यांनी, दि. १५/०७/२०२४ रोजी बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांच्या संदर्भांत चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते.
यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे शिष्टमंडळ आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांच्या बरोबर त्यांच्या सभागृहात अनुक्रमणिका १ ते ३१ या बांधकाम कामगारांच्या हिताचा कल्याणकारी मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
बरेचशे विषय त्यांच्या कार्यक्षेत्रातील असल्याने ते मान्यतेसाठी टिप्पणी करून मंडळाच्या माध्यमातून परिपत्रक काढून तसे प्रसिद्ध करण्याचे ठरले. तसेच उर्वरित विषय त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असल्याने माननीय मुख्यमंत्री व प्रधान सचिव यांना वर्ग करण्याचे ठरले.
यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य महासचिव मा. सुरेशजी मोहिते , मुंबई महासचिव मा. सुनीलजी लोखंडे , मा. वेदान्त जाधव रायगड जिल्हा निरीक्षक, पक्षिम महाराष्ट्र महासचिव मा. प्रशांतजी वाघमारे , सांगली जिल्हा संपर्कप्रमुख मा.संजय कांबळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा. संजय गुदगे, सांगली जिल्हा महासचिव मा. अनिल मोरे , सांगली जिल्हा कार्याध्यक्ष मा.जगदिश कांबळे, कोल्हापूर जिल्हा संघटक लक्ष्मण सावरे, मा. दिपाली वाघमारे यांच्या सह आदि बांधकाम कामगार उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Youtube Link
👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖