भिलवडी वार्ताहार : ३१ मे २०२४
हनुमान विकास सोसायटी धनगांव ता.पलूस यांच्या वतीने गावातील इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सोसायटीचे चेअरमन दीपक भोसले,व्हा. चेअरमन मारुती यादव,धनगांव गावच्या पोलिस पाटील सौ.मनिषा मोहिते,उपसरपंच हणमंत यादव आदी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी,पालक,मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था विविध दिशादर्शक उपक्रम राबविणार असल्याची माहिती चेअरमन दीपक भोसले यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते दत्ता उतळे, धनगांव हायस्कूल चे मुख्याध्यापक रमेश साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी माजी चेअरमन मधुकर पाटील,जगन्नाथ पाटील,सचिन साळुंखे,शशिकांत यादव,शैलेश साळुंखे,शरद साळुंखे,रमेश पाटील,घनश्याम साळुंखे,विजय साळुंखे,शुभम साळुंखे,संभाजी पाटील,माणिक तावदर,शरद जाधव,आनंदा उतळे,मनोज साळुंखे,प्रियांका सावंत आदींसह विद्यार्थी पालक उपस्थित होते.
धनगांव येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार करताना दीपक भोसले,मारुती यादव,सौ.मनिषा मोहिते,हणमंत यादव,सचिन साळुंखे,मधुकर पाटील,दत्ता उतळे,घनश्याम साळुंखे आदी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖