BANNER

The Janshakti News

नीट परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भिलवडी येथे सत्कार ....




भिलवडी दि. १६ जून २०२३ : बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा भिलवडी आणि जायंटस् ग्रुप ऑफ भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने नीट परीक्षांमध्ये उज्वल यश मिळविलेल्या भिलवडी व माळवाडी येथील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा नुकताच भिलवडी येथे संपन्न झाला.

 यावेळी सुप्रसिध्द उद्योजक मा. श्री. गिरीश चितळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भिलवडी ता. पलूस येथील बिरेश्वर को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी आणि जायंटस् ग्रुप ऑफ भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने नीट परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन   केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.  

  जायंटस् ग्रुपचे माजी अध्यक्ष श्री सुधीर गुरव यांनी सर्वप्रथम प्रमुख पाहुणे आणि विद्यार्थी, पालक यांचे संस्थेच्या आणि ग्रुपच्या वतीने स्वागत केले. 


 मा.श्री गिरीश  चितळे यांनी संस्थेस भेट दिले बद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने संस्थेचे सल्लागार श्री कपिल शेटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

  संस्थेचे शाखाधिकारी मा. विनय सदलगे यांनी संस्थेविषयी माहिती दिली. 


नीट परीक्षा मध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल कु. ऐश्वर्या अरुण गुरव कु. आरती शशिकांत पाटील  कु. गौरी अभिजीत आरते आणि कु.श्रेयश चंद्रशेखर बकरे या गुणवंत विद्यार्थ्यांचा   प्रमुख पाहुणे मा.श्री गिरीश  चितळे यांच्या हस्ते झाडे देऊन सत्कार करण्यात आला. 



  यावेळी बोलताना मा.गिरीश चितळे यांनी संस्थेविषयी गौरवउदगार काढले संस्था ही फार मोठी असून या संस्थेच्या वतीने भिलवडी पंचक्रोशीतील लोकांची सेवा होईल आणि भिलवडीसह परीसरातील नागरीक  संस्थेच्या विविध योजनेचा फायदा घेतील आणि त्यांना साथ देतील. भविष्यात संस्थेची अशीच प्रगती होत राहील . तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना सुद्धा भविष्यात अशीच प्रगती होऊन त्यांना यश संपादन होऊन भिलवडीचे नाव उंचावण्याचे काम करतील असे गौरवउदगार काढले.   


  यावेळी विद्यार्थ्यांशी त्यांनी हितगुज संभाषण यांचा अनुभव चर्चा केली.  

  यावेळी जायंटस् ग्रुपचे अध्यक्ष मा.सुबोध वाळवेकर , कार्यवाहक श्री विशाल साबळवाडे , माजी अध्यक्ष उत्तम मोकाशी , उद्योजक विजय राजाराम पाटील  , अभिजीत आरते , संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. शेवटी सुबोध वाळवेकर यांनी उपस्थितांचे  आभार व्यक्त केले.

हेही पहा ---


https://youtu.be/T_lrA-LNXHw?si=Kw9xwrE3-Q5OjmSp

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖