BANNER

The Janshakti News

लेखकाची दृष्टी कथेला उंची प्राप्त करून देते - कवी प्रदीप पाटील


 
 

   भिलवडी दि. १७-   भोवतालच्या समाजजीवनाचे निरीक्षण गांभिर्याने करून लेखकाने आपले आकलन  वाढविले,तरच त्याची जीवनविषयक दृ ष्टी व्यापक होते. लेखकाची दृष्टी कथेला उंची प्राप्त करून देते,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रसिद्ध कवी प्रदीप पाटील यांनी केले. यावेळी व्यासपीठावर सांगली जिल्हा परीषद, माजी सद्स्य मा. दादा पाटील , उद्योजक मा. गिरीश चितळे सरपंच सौ. विद्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 
                   भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या समारंभामध्ये  विष्णु कांबळे यांच्या 'झुंज' या कथासंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.   



 अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक विजय जाधव होते.
             आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले,विष्णू कांबळे यांच्या कथांमधील अनुभव वर्तमान जगण्यातील आहेत.जुन्या माणसांच्या श्रद्धा आणि नव्या पिढीची बदललेली व्यावहारिक मानसिकता यांच्यातील संघर्ष त्यांच्या कथेत येतो.आजच्या भाषेत त्यांची कथा अभिव्यक्त होत असल्यामुळे ती वाचकाला भिडते. यावेळी भिलवडीचे ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे सर यांनी झुंज या कथासंग्रहाचा विस्ताराने परिचय करून दिला. श्री गिरीश चितळे सौ.विद्या पाटील अध्यक्ष विजय जाधव यांनी प्रकाशन सोहळ्यात शुभेच्छा दिल्या. स्वागत प्रास्ताविक केळकर सर यांनी केले आभार शरद जाधव यांनी मांडले यावेळी महादेव माने , डी आर कदम , प्राध्यापक महेश पाटील , रमेश चोपडे यांच्यासह वाचनालयाचे सेवक, सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖