BANNER

The Janshakti News

पलूसमध्ये आमदार डॉ विश्वजीत कदम यांचे जोरदार स्वागत



                                VIDEO





पलूस दि. ४ जून : ४४, सांगली लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पहिल्या फेरीपासून  मतमोजणीत आघाडी घेतल्यानंतर पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळ पासूनच जलोषास सुरुवात केली होती. प्रत्येक फेरीमध्ये विशाल पाटील यांना लीड वाढत गेले आणि अखेरीस विशाल पाटील हे विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले. दरम्यान आमदार डॉ विश्वजीत कदम यांचे हेलिकॉप्टरने कृष्णा वेरळा सुतगिरणी या ठिकाणी आगमन होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी व जल्लोष करत फटाक्यांची जोरदार आतषबाजी आणि गुलालांची उधळण करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी पलूस शहरातून भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. 
  
 
यावेळी बोलताना आमदार डॉ.विश्वजीत कदम म्हणाले 
सांगली लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा पहिल्यापासूनच बालेकिल्ला राहिला आहे हे सर्व मतदारांनी आज दाखवून दिले आहे. देशामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तनाची लाट आहे याचीच प्रचिती निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांना आली आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी अगदी मनापासून काम केले आहे.


यावेळी  रयत शिक्षण  संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड, ज्येष्ठ नेते गणपतराव सावंत, पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले,  घनश्याम सूर्यवंशी, पांडुरंग तात्या सूर्यवंशी, नगरपरिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले, गिरीश  गोंदिल, विशाल दळवी, तालुक्यातील
 सर्व काँग्रेसचे सर्व नेते मंडळी उपस्थित होते.या जंगी स्वागतानंतर  आमदार डॉ. विश्वजीत कदम सर्व कार्यकर्त्यांसह सांगलीला रवाना झाले.


 सकाळी निकाल पहिल्या फेरीचे हाती आल्यापासूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांचे आतसबाजी सुरुवात केली   कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळीपासूनच  गर्दी करण्यास सुरुवात केली होती. काँग्रेस संपर्क कार्यालयाजवळ गुलालाची उधळण करण्यात आली,काँग्रेसचे सर्व नगरसेवक ,सर्व काँग्रेस प्रेमींनी एकच जल्लोष केला. आमदार डॉ विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या विजयाच्या जोरदार घोषणाबाजीने आसमंत दणाणून गेला.


पलूस शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर जणांना सोडला काँग्रेस संपर्क कार्यालयासमोर जोरदार फटाक्यांची आतचषबाजी तसेच गुलालाची उधळण करण्यात आली.



विशाल पाटील यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली निर्णायक आघाडी उत्तरोत्तर वाढतच गेली. विशाल पाटील यांचा अपक्ष म्हणून असलेला विजय काँग्रेसला मोठे बळ देणारा ठरला आहे. यानिमित्ताने आमदार डॉ विश्वजीत कदम यांचे जिल्ह्यातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. काँग्रेसला पुन्हा एकदा 'अच्छे दिन'ची चाहूल लागली आहे.

हेही पहा ---


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖