BANNER

The Janshakti News

भिलवडीत अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी..






भिलवडी दि. २ जून : पलूस तालुक्यातील भिलवडी येथील वसंतदादानगर येथे संयुक्त मित्रमंडळ वसंतदादानगर भिलवडी यांच्या वतीने दि. ३१ मे रोजी अखंड हिंदुस्तानातील अनेक हिंदु मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या तसेच तळागाळातील समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या लोकमाता  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती विविध मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


 भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या सह उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन जयंती उत्सवास सुरुवात करण्यात आली तर देशासाठी बलिदान दिलेले शिगाव येथील शहीद जवान रोमित चव्हाण यांचे वडिल तानाजी चव्हाण यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी  भिलवडी साखरवाडी, वसंतदादा नगरसह माळवाडी येथील नागरिक व समस्त धनगर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

 यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या भिलवडी व परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  जयंतीच्या निमित्ताने  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 


यावेळी आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील , उपाध्यक्ष कयूम पठाण , खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतची माजी सरपंच व विद्यमान सदस्य  धनाजी गायकवाड , भारतीय जनता पार्टी (अल्पसंख्यांक मोर्चा) सांगली ग्रामीण  “जिल्हा अध्यक्ष’ अमिर सलामत , सामाजिक कार्यकर्ते  इम्रान जमादार , हिंदुस्तान शिव मल्हार क्रांती सेनेचे विकी पुजारी, चॅलेंजर्स ग्रुपचे अध्यक्ष दीपक पाटील ,  अरमान सुतार , इरफान शेख , रोहित भोईटे , सुरेश मदने , तुकाराम माने , शकील जमादार , समाधान भजनावळे , परवेज सुतार , बडकुल रोजे, सुरेश चौगुले , प्रकाश उर्फ सोन्या यमगर ,चेतन आरगे ,अनिकेत रांजणे , अल्ली मुजावर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖