BANNER

The Janshakti News

मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम पार पाडावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न


 

 

        सांगली दि. 29 (जि.मा.का.) :- मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी अचूकतेने पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा  जिल्हा  निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या.

            44-सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 4 जून 2024 रोजी  वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार आहे. या निमित्ताने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण सत्रात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा कोषागार अधिकारी  रमेश लिधडे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुखसे आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत प्रशासनाने आतापर्यंत सर्वांच्या सहकार्याने चांगले काम केले आहे. मतमोजणीचे कामही अत्यंत चांगल्या पध्दतीने होण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे. मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरास प्रतिबंध असल्याने कोणीही सोबत मोबाईल वा  स्मार्ट वॉच सोबत ठेवू नये.

मतमोजणीचे काम सुरळीतपणे व्हावे. या कामात अचूकता महत्त्वाची असल्याने संबधित अधिकारी, कर्मचारी यांनी हे काम सचोटीने करावे. मतमोजणीच्या कामाचे संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी कोणतेही दडपण घेऊ नये, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिल्या.

उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात आणि उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना सादरीकरणाद्वारे मतमोजणी प्रक्रिया संदर्भात यावेळी सविस्तर माहिती दिली.

हेही पहा ----


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖