BANNER

The Janshakti News

एक हजार 224 मतदान केंद्रांचे होणार वेबकास्टिंग - जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी

 

        सांगली दि. 6 (जि.मा.का.) :  जिल्हयात लोकसभा मतदार संघासाठी उद्या मंगळवार 7 मे रोजी 2 हजार 448 मतदान केंद्रांवर मतदान होत असून यातील 1224 मतदान केंद्रांचे वेबकास्टींग करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी दिली.


वेबकास्टींग करण्यात येत असलेल्या मतदान केंद्रांवर दोन व्हिडीओ कॅमेरे लावण्यात आले आहेत. एका कॅमेऱ्याव्दारे मतदान केंद्राबाहेरील व एका कॅमेऱ्याव्दारे मतदान केंद्रातील संपुर्ण परिस्थितीवर नजर ठेवली जाणार आहे. वेबकास्टींग करण्यात येत असलेल्या 1224 मतदार केंद्रावरील लाईव्ह चित्रीकरण मा. निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयात पाहण्याची सोय करण्यात आली आहे.


वेबकास्टींग करण्यात येत असलेल्या मतदान केंद्रांचे चित्रीकरण पाहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल यांच्या देखरेखीखाली वेबकास्टींग नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला असून या कक्षासाठी 12 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖