BANNER

The Janshakti News

लोकशाहीच्या उत्सवासाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी मतदान साहित्य घेऊन रवाना


जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी साधला कर्मचाऱ्यांशी संवाद



 

        सांगली दि. 6 (जि.मा.का.) :  जिल्ह्यात उद्या मंगळवार, 7 मे रोजी लोकशाहीचा उत्सव साजरा होत असून या उत्सवात 2 हजार 448 केंद्रावर मतदान होत आहे. यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रावर रवाना झाले.


जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी 281-मिरज आणि 282-सांगली विधानसभा मतदार संघातील मतदान साहित्य वाटप केंद्रास भेट देऊन मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मिरज येथील साहित्य वाटप केंद्रावर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही भेट दिली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन उपस्थित होते.

लोकशाहीच्या उत्सवात मतदान प्रक्रियेत मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे या अधिकारी कर्मचारी यांनी मतदान प्रक्रिया निर्भय, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी योगदान द्यावे अशा, सूचना त्यांनी दिल्या. 


मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी एस. टी. बसेस व अन्य वाहनांची सोय करण्यात आली असून या वाहनातून मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या केंद्रावर रवाना झाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖