BANNER

The Janshakti News

बारा लाखांची शिष्यवृत्ती.....; कुंडलच्या प्रतिनिधी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा...


                       thejanshaktinews.in

कुंडल : वार्ताहर            दि. 26 एप्रिल 2024

गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडलच्या प्रतिनिधी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी बारा लाखांची शिष्यवृत्ती मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आमदार अरुणअण्णा लाड यांनी कौतुक व अभिनंदन केले.


शाळेच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती  दशरथ आवटे, आयुष बाबर, रुद्रप्रताप थोरात, सिद्धी गायकवाड या विद्यार्थ्यांनी मिळवली. तर सारथी शिष्यवर्ती मधून अथर्व महाडिक, समृद्धी जाधव, जिज्ञासा मोहिते, साक्षी सिंगण, धनश्री सावत,सुजय किर्दक, तनुज पवार, कृष्णा लाड, रुद्र लाड, सिद्धांत पवार, श्रावणी शिंदे, श्रुतिका जगदाळे, आयुष पवार, प्राजक्ता थोरबोले, सानिका चव्हाण, सक्षम चव्हाण, ऋग्वेद माने, वैष्णवी आवटे, श्रद्धा लाड, वैष्णवी पाटील, प्राजक्ता कदम, अथर्व पाटील, सुयश आवटे, आयुष लाड, श्रीहरी बागेवाडकर, वेदिका मुळीक या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

या वैद्यार्थ्यांना उपाध्यक्ष सी.एल.रोकडे, सचिव ऍड.प्रकाश लाड समन्वय समिती सचिव किरण लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड, मुख्याध्यापक सी.वाय.जाधव, उपमुख्याध्यापिक जयश्री पट्टणशेट्टी यांचेसह सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

हेही पहा -----➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖