निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : 44-सांगली लोकसभा मतदार संघात दि.7 मे 2024 रोजी मतदान होत असून निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाची जबाबदारी महत्त्वाची आहे. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक मतदारचा सहभाग असावा, यासाठी यंत्रणेने सुयोग्य नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी,अशा सूचना सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी. यांनी आज दिल्या.
44-सांगली लोकसभा मतदार संघातील निवडणूक कामाकाजा आढावा सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी, निवडणूक पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा व निवडणूक खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी आज घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधिक्षक संदिप घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी 44-सांगली लोकसभा मतदार संघात निवडणूक यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली, यामध्ये मतदान केंद्रावरील सुविधा, उपलब्ध मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, ईव्हीएम, व्होटर हेल्पलाईन, सीव्हीजील ॲप, कायदा सुव्यवस्था याबाबत निवडणूक निरीक्षकांना माहिती दिली.
हेही पहा-----
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖