BANNER

The Janshakti News

जात प्रमाणपत्र पडताळणी वेळेत करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान टाळावे ...नंदिनी आवडे


               ww.thejanshaktinews.in




सांगली  : वार्ताहार        दि. 26 एप्रिल 2024

  सांगली : जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी सांगली यांच्या वतीने समता पंधरवडा निमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन वेबिनार कार्यशाळा संपन्न झाली. 

   जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली अध्यक्षा तथा अप्पर जिल्हाधिकारी मा.नंदिनी आवडे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव बाळासाहेब कामत, शिक्षण विभागाच्या उपसंचालक , गीता पाटील, बार्टीचे सांगली जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे, समितीच्या लघु टंकलेखक स्नेहलेता ठोंबरे व सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, जिल्ह्यातील समतादुत,  महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागाचे व समान संधी केंद्राचे कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या उपस्थितीत ऑनलाइन वेबिनार कार्यशाळा संपन्न झाली.



याबाबत सविस्तर वृत्त असे की वेळेत जात प्रमाणपत्र पडताळणी करून  शैक्षणिक नुकसान टाळावे असे प्रतिपादन सांगली जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी नंदिनी आवडे यांनी केले ते ऑनलाइन वेबिनार कार्यशाळेमध्ये जात पडताळणी मार्गदर्शन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी जात पडताळणी कशी करावी याबाबत इयत्ता अकरावी व बारावी सायन्स व तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी वेळेत जात पडताळणी करून भावी काळात मिळणाऱ्या शैक्षणिक सवलतींचा लाभ घ्यावा, व्यवसाय शिक्षणात शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, वंशावळ कशी करावी ,जातीचे प्रमाणपत्र, मूळ कागदपत्र महसूल पुरावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाकरिता व विविध शिष्यवृत्ती चा लाभ घेण्याकरिता जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी साठी विविध महसूल पुरावे व शैक्षणिक पुरावे कशा पद्धतीने शोध घेऊन त्याची पूर्तता करावी याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच या व्यतिरिक्त व्यवसायाच्या निगडित असणारे विविध पुरावे याबाबत ही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी करताना स्वतःचा ईमेल आयडी किंवा पालकांचा ईमेल आयडी व चालू पालकांचा संपर्क नंबर देणे अत्यंत आवश्यक आहे व स्वतःच्या व पालकांच्या ईमेल आयडी वरूनच जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रिया करण्यात यावी असे महत्त्वपूर्ण माहिती सांगितली जेणेकरून ऑनलाइन जात प्रमाणपत्र पडताळणी मिळण्यास अर्जदारास अडचण येणार नाही व कागदपत्राबाबत काही त्रुटी असतील तर ते ईमेल द्वारे व संपर्कद्वारे पालकांना समजतील व जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतची त्रुटी पूर्तता लवकर करता येईल व पाल्यांचे वेळेत जात प्रमाणपत्र पडताळणी होण्यास अडचण येणार नाही व वेळेत जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाइन उपलब्ध होईल अशी महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. 

तसेच उपस्थित पालकांच्या प्रश्नांचे निरासरन समितीच्या अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी नंदिनी आवडे यांनी केले. उपस्थित पालकांमधून काही सूचना करण्यात आल्या ग्रामीण भागात जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन कार्यशाळा विविध महाविद्यालयात राबवण्यात यावे व त्या महाविद्यालयात विद्यार्थी व पालक यांना बोलवण्यात यावे. प्रस्ताव सादर केल्यानंतर ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी ई-मेलवर अथवा मोबाईल नंबर वर पाठवण्यात यावेत असे पालकांनी सूचना मांडल्या.

 ऑनलाइन वेबिनार कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता बार्टीच्या समतादूत यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शिक्षण विभागाच्या उपसंचालिका गीता पाटील यांनी ऑनलाईन वेबिनार आयोजन केल्याबद्दल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विशेष आभार मानले व बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना वेळेत जात प्रमाणपत्र पडताळणी देण्याबाबतची भूमिका मांडली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतचे महत्त्वपूर्ण माहिती सदरच्या कार्यशाळेच्या माध्यमातून व महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल व विद्यार्थ्यांच्या काही शंका असतील तर त्या महाविद्यालय स्तरावर सोडवता येईल याबद्दल त्यांनी आभार मानले व ऑनलाइन वेबिनार कार्यशाळेचे कौतुक केले. ऑनलाइन वेबिनार कार्यशाळे करिता महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, शिष्यवृत्ती विभाग व समान संधी केंद्राचे सर्व कर्मचारी, जिल्ह्याचे सर्व समतादूत, विद्यार्थी, पालक, शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही पहा----


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖