yuva MAharashtra राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचार संहितेचे पालन करावे .....निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी.

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचार संहितेचे पालन करावे .....निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी.

 



सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये 44-सांगली लोकसभा मतदार संघात 7 मे 2024 रोजी मतदान होत असून राजकीय पक्ष  व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन जनरल निरिक्षक परमेश्वरम बी. यांनी केले.

आदर्श आचारसंहिता संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्ष प्रतिनिधी व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी समवेत बैठक संपन्न झाली. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे आदी उपस्थित होते.

            जनरल निरिक्षक परमेश्वरम बी. यांनी सांगितले, सांगली लोकसभा मतदार संघात निवडणूक निर्भय, भयमुक्त वातावरणात होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. आदर्श आचार संहितेमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे सर्वांनी पालन करावे. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

प्रचारासाठी आवश्यक परवानग्या घ्या... जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

44-लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी त्यांच्या प्रचारासाठी वाहन, सभा, रॅली, प्रचार साहित्य, ऑडिओ, व्हिडिओ, प्रमाणीकरण यासह आवश्यक असणाऱ्या परवानग्या संबंधित कक्षाकडून घ्याव्यात. या परवानगीसाठी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत केले. handbill, pamphlet, manifesto यांची  छपाई करताना त्यावर मुद्रक आणि प्रकाशक यांची नावे नमूद करणे आवश्यक आहे. याबाबत आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे, उमेदवाराने प्रत्येक दिवसाचा खर्च विहित नमुन्यात खर्च विषयक समितीस सादर करावा. खर्च सादर करण्यासाठी प्रतिनिधीची नेमणूक करावी. प्रचारात लहान मुलांचा सहभाग करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी आदर्श आचारसंहिता व निवडणूक प्रचार कालावधीत काय करावे आणि काय करू नये याची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.



हेही पहा-----




➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖