BANNER

The Janshakti News

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे .......निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील


                  www.thejanshaktinews.in




खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे

.......निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील

      

        सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : खरीप हंगाम मध्ये शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके वेळीच उपलब्ध व्हावीत. यासाठी कृषी विभागाने खरीप हंगामचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी दिल्या.

जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2024 आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात झाली. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक जांबुवंत घोडके, विभागीय कृषी अधीक्षक श्री. अजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ, कृषी उपसंचालक डी. एम. पाटील आदी उपस्थित होते.

श्रीमती पाटील यांनी सांगितले, कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे लाभ व्हावा यासाठी योजनांची प्रभावी प्रचार व प्रसिद्धी करावी. खरीप हंगामसाठी आवश्यक, बी-बियाणे, कीटकनाशके, खतांची मागणी करून हा साठा उपलब्ध करून ठेवावा.

खरीप 2024 च्या  हंगामा मध्ये बियाणे व खतांची पुरेशी उपलब्धता करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोठेही टंचाई निर्माण होणार याची कृषी विभागाने दक्षता घेतली आहे. आपत्कालीन पीक परिस्थितीत करावयाच्या उपाय योजनेमध्ये राखीव बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे व खतांच्या संरक्षित साठ्याचे नियोजन झाले असून त्याचा वापर टंचाई निर्माण झाल्यास दुबार पेरणीसाठी करण्यात येणार आहे. खते व बियाणांची साठेबाजी तसेच जादा दराने विक्री होऊ नये व योग्य दर्जाची बियाणे व खते शेतकऱ्यांना पुरवठा करणेसाठी कृषी विभाग सतर्क असून तक्रार निवारण कक्ष व भरारी पथके कार्यान्वीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी बैठकीत दिली.

प्रकल्प संचालक श्री. घोडके यांनी आत्मा मार्फत सन 2024-25 मध्ये राबविण्यात येणार असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तर विभागीय कृषी सह संचालक कोल्हापूर कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी  यांनी कृषी विभागाने सतर्क राहून शेतकऱ्यांना दर्जेदार खते व बियाणे वेळेत उपलब्ध होतील याचे सूक्ष्म नियोजन करावे. घरचे सोयाबीन बियाणे याची उगवणक्षमता चाचणी प्रात्यक्षिके व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके गाव पातळीवर मोहीम स्वरुपात आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीस कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे प्रभारी अधिकारी डॉ. मिलिंद देशमुख, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, सहा.महा.प्रबंधक निलेश चौधरी, जिल्हा अग्रणी बँकचे प्रबंधक विश्वास वेताळ, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.अजयनाथ थोरे, कृषी विज्ञान केंद्र कांचनपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनार पाटील, महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाचे सहायक व्यवस्थापक एस.एस.पाटील, क्षेत्रीय व्यवस्थापक राष्ट्रीय बीज निगम पुणे एस. एस.बडोले, महाबीजचे क्षेत्र अधिकारी  जी.एस.जायपत्रे यांच्यासह कृषी व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️


Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️