BANNER

The Janshakti News

सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोफत सामुदायिक सोहळा दिमाखदार वातावरणात संपन्न





पलूस प्रतिनिधी : 

आपण या मातीचे काहीतरी देणे लागतो या कृतज्ञतेच्या भावनेतून
पलुस येथील सोनाई चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने  आयोजित सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळयासाठी पलूस व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पलुसमध्ये मोफत सामुदायिक विवाह सोहळा 22 वे वर्ष  असल्याने  भव्य व आकर्षक सजावट  करण्यात आली होती .

स्वागत सोनाई ट्रस्टचे संस्थापक गणपतराव पुदाले,पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले,  पलूस नगरपरिषद माजी  गटनेते सुहास पुदाले,पलूस  शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  प्रकाश पुदाले. कार्यवाह जयसिंगराव सुर्यवंशी सहकार्यवाह जयंत कदम  मोहन पुदाले ,सर्व सदस्य आदीनी केले .    

           यावेळी माजी कृषिमंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड, मानसिंग बँकेचे संस्थापक जे.के. बापू जाधव, ज्येष्ठ नेते किरण तात्या लाड, पांडुरंग सूर्यवंशी, शेखर साळुंखे,शंकर पवार, व्ही.वाय.पाटील,विशाल दळवी,अजित कुलकर्णी सर्जेराव पवार,  सुनील सावंत, गणपतराव सावंत यांच्यासह परिसरातील सर्व मान्यवर ,सर्व संस्थांचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते .


 दुष्काळग्रस्त, गोरगरीब,गरजूंसाठी मदतीचा हात देणार्या,सोनाई चँरिटेबल ट्रस्ट पलुस यांच्या वतीने मोफत सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला 

 यामध्ये ८  जोडप्याचे लग्नकार्य मोफत करुन देण्यात आले. प्रत्येक जोडप्यास मणी मंगळसुत्र, मुला-मुलीचे कपडे, संसार उपयोगी भांडी मोफत दिली.दोन्ही बाजूकडील लोकांची जेवणाची सोय केली. तसेच मंडप व स्पीकरची व्यवस्था केली.

  .पलुसमध्ये मोफत सामुदायिक विवाह सोहळा सलग 17 वे वर्ष  आहे .सतत 16वर्षे    दुष्काळ ग्रस्त आपतग्रस्त गोरगरीब गरजूसाठी हात देणारी पलूस परिसरातील एकमेव संस्था आहे . सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळाचे हे सलग 22 वे वर्ष आहे . या  सोहळ्यात मणींमगळसुञ , प्रत्येक जोडप्याला संसारपयोगी भांडी ,कपडे ,जेवण ,असा सर्व खर्च ट्रस्टचे वतीने मोफत करण्यात आला.

या सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात आजअखेर शेकडो विवाह संपन्न झाले आहेत ट्रस्टचे वतीने प्रतिवर्षी शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केलेल्या आहेत.संयोजन अरुण पुदाले विकास पुदाले, विलास पुदाले , संजय गणेशकर, विलास हजारे ,जगन्नाथ पुदाले ,मनोहर बुचडे, अजित पुदाले, सुरेश पुदाले ,महादेव पुदाले , नारायण बुचडे, श्रीधर मोरे व ट्रस्टचे शेकडो कार्यकर्ते  यांनी केले.सुञसंचालन श्रीकांत  माने यांनी केले.



सोनाई चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने  आयोजित सामुदायिक विवाह सोहळा प्रसंगी डॉ.विश्वजित कदम ,  महेंद्र आप्पा लाड, गणपतराव पुदाले  वैभवराव पुदाले ,  सुहास पुदाले  प्रकाश पुदाले.जयसिंगराव सुर्यवंशी संजय गणेशकर, जयंत कदम व मान्यवर

हेही पहा.....


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖