BANNER

The Janshakti News

पलूसच्या श्री समर्थ धोंडीराज महाराजांच्या यात्रेस रविवार दिनांक 5 मे पासून प्रारंभ..









पलूस दि. 29 : सांगली जिल्ह्यातील पलूस येथील श्री समर्थ धोंडीराज महाराज सार्वजनिक ट्रस्ट (गादी मठ पलूस) व पलूस नगरपरिषद यांच्या विद्यमाने
श्री समर्थ सदगुरु धोंडीराज महाराज  याञेनिमित्ताने भरगच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रा रविवार दिनांक 5 मे ते शुक्रवार दिनांक 10 मे अखेर  होणार असल्याची माहिती श्री समर्थ धोंडीराज महाराज सार्वजनिक  ट्रस्टच्या वतीने देण्यात आली . यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष भिवाजी पाटील उपाध्यक्ष  बाळासाहेब फडनाईक खजिनदार धनाजी पवार सचिव संतोष पाटील, यांच्यासह  सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

  रविवार दिनांक 5 मे  रोजी दुपारी 4 वाजता आरती महानैवेद्य व महाप्रसाद वाटप पुसेगाव देवस्थान ट्रस्ट चे मठाधिपती महंत सुंदरगिरीजी महाराज यांचे हस्ते होणार आहे .रात्री श्रीं.ची भव्य मिरवणूक व शोभेचे दारुकांम होणार आहे. आचारसंहिता असल्याने रात्री दहापर्यंत सर्व कार्यक्रम होतील.


बुधवार दिनांक 8 मे रोजी साध्या सायकल स्पर्धा व खुल्या सायकल स्पर्धा सकाळी  8 वाजता आहेत. यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. रात्री सात वाजता बहारदार लावण्यांचा कार्यक्रम हुतात्मा स्मारक येथे होईल गुरुवार दिनांक 9 मे रोजी भव्य आर्केस्ट्रा चे आयोजन करण्यात आले आहे

. शुक्रवारी सायंकाळी  4 ते  7 निकाली कुस्त्यांचे मैदान  हुतात्मा स्मारक पलूस येथे होणार आहे . शुक्रवारी 10 मे रोजी रात्री 7.30 वाजता लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले आहे 

पलूस मध्ये श्री समर्थ धोंडीराज महाराज यांचे मंदिर व गादीमठ हे पलूसवासियांचे श्रद्धास्थान व आराध्य ग्रामदैवत आहे , श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रेनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. .सर्वञ उत्साहाचे वातावरण आहे . मुलांनाही उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने उत्साहाचे वातावरण सर्वत्र दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहिता असल्याने सर्व कार्यक्रम रात्री दहापर्यंतच होतील.


हेही पहा-----

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖