yuva MAharashtra पलूसकर शैक्षणिक संकुलात मतदार जनजागृती अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न..

पलूसकर शैक्षणिक संकुलात मतदार जनजागृती अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न..


प्रांताधिकारी रणजीत भोसले साहेब, तहसीलदार सौ.दीप्ती रिठे मॅडम यांची पलूसकर शैक्षणिक संकुलास भेट..
 


 पलूस वार्ताहर ता. ८ :     पंडित विष्णू दिगंबर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने  मतदार जागृती अभियानाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पलूस कडेगावचे प्रांताधिकारी  रणजीत भोसले ,तहसीलदार  सौ.दीप्ती रिठे  यांनी भेट देऊन कौतुक केले...


     यावेळी  गटविकास अधिकारी  प्रदीप पाटील , केंद्रप्रमुख किरण आमणे, संस्थेचे सचिव जयंतीलाल शहा , उपाध्यक्ष विश्वास रावळ, संचालक संजय परांजपे , मुख्याध्यापक तानाजी करांडे, बळीराम पोतदार,  बाळकृष्ण चोपडे, सुनील रावळ, विकास कांबळे, सुनील पुदाले,सौ.सायली मेरू , सौ ए.ए.कुलकर्णी ,  सौ.सुनिता कोळी , सौ.कविता  कदम  यांच्यासह माध्यमिक ज्युनियर विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


  येत्या सात मे रोजी लोकशाहीचा उत्सव पार पडत आहे . सांगली लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी  मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे  वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन माननीय भोसले साहेब यांनी केले.


     मतदानाची टक्केवारी वाढावी  या मोहिमेचा उद्देश असून या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे  व सर्व संचालक मंडळ यांनी केले.
  रांगोळी स्पर्धेचे संयोजन ज्युनियर विभागातील  सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले... या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून सुंदर अशा रांगोळ्या काढल्या. सर्वांनी याचे कौतुक केले.



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆