मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'उष्माघात उपाययोजना' या विषयी आपत्ती व्यवस्थापन संचालक, लहुराज माळी यांची मुलाखत बुधवार दि. १० एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.
उष्णतेच्या लाटा, आपत्तीपूर्व नियोजन, उष्माघात टाळण्यासाठी विविध उपाय योजना याविषयी सविस्तर माहिती 'दिलखुलास' कार्यक्रमातून श्री. माळी यांनी दिली आहे. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
हेही पहा ---
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆