BANNER

The Janshakti News

अखेर सांगलीची जागा ठाकरे गटालाच ; विशाल पाटील आता काय निर्णाय घेणार याकडं महाराष्ट्राचं लक्ष...






मुंबई ता.९ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद मुंबई येथे पार पडली. यामध्ये तिन्ही पक्षाचा जागावाटपाचा तिढा सुटला आहे. अखेर सांगलीची जागा ठाकरे गटालाच मिळाली आहे.यामुळे सांगलीची जागा काॅंग्रेस लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
   महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलामध्ये शिवसेना ठाकरे गटाला 21 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला10 आणि काँग्रेस पक्षाला 17 जागा देण्यात आल्या आहेत. 


अखेर सांगली काँग्रेसला नाहीच, विशाल पाटलांच्या भूमिकेकडं राज्याचं लक्ष..

दरम्यान, काँग्रेसला जरी 17 जागा मिळाल्या असल्या तरी सांगली लोकसभेची जागा मात्र, उध्दव बाळासाहेब ठाकरे गटालाच मिळाली आहे. कारण या जागेवरुन महाविकास आघाडीत मोठा तिढा निर्माण झाला होता. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा काँग्रेस लढणारच असा पवित्रा काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी घेतला होता. मात्र, अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा उबाठा गटाला सोडण्यात आली आहे. त्यामुळं आता या जागेवरुन विशाल पाटील काय निर्णय घेणार? ते निवडणूक लढवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
   दरम्यान, आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाल्यानंतर विशाल पाटील किंवा विश्वजीत कदम यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळं ते आता काय निर्णाय घेणार याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे. 



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆