BANNER

The Janshakti News

भिलवडी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी विश्वास चितळे ; उपाध्यक्षपदी डॉ.बाळासाहेब चोपडे यांची निवड





पलूस / भिलवडी दि. २ : अमृत्मोहोत्सवी भिलवडी शिक्षण संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.अध्यक्षपदी विश्वास परशुराम चितळे यांची तर उपाध्यक्षपदी डॉ.बाळासाहेब शामराव चोपडे यांची निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्था सचिव मानसिंग हाके यांनी कामकाज पहिले.
संस्थेचे विश्वस्त जे.बी.चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना पद व गोपनियतेची शपथ देण्यात आली. माजी पदाधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडे कार्यभार सुफुर्द केला.


नूतन संचालक पुढीलप्रमाणे,यशवंत आनंदराव पाटील,धनंजय सुभाष पाटील,सौ.लीना गिरीश चितळे,डॉ. रविंद्र श्यामराव वाळवेकर,अजय श्रीपाल चौगुले,सदाशिव नामदेव तावदर,मुकुंद चिंतामणी जोग,महावीर आप्पा वठारे,संभाजी श्रीपती सूर्यवंशी,चंद्रकांत बाबुराव पाटील.विश्वस्त पदी गिरीश दत्तात्रय चितळे,अशोक धोंडी चौगुले, डॉ.सुहास यशवंत जोशी यांची निवड करण्यात आली.

माजी संचालक जयंत केळकर यांनी सर्व संचालकांनी संस्थेच्या सर्वांगीण विकासात वेळेसह विविध उपक्रमात योगदान देण्याचे आवाहन केले.

सर्व संचालकांनी प्रतिवर्षी पंचवीस हजाराची देणगी संस्थेला देण्याचे सर्वानुमते ठरले.सहसचिव के. डी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले.माजी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नूतन संचालकांचा अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.

भिलवडी शिक्षण संस्थेमधील सर्व शाखांमधील सेवकांच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.दर्जेदार शिक्षणातून उत्तम विद्यार्थी घडविणे हेच भिलवडी शिक्षण संस्थेचे ध्येय असून आम्ही सर्व पदाधिकारी सामाजिक बांधिलकी म्हणून सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहू असे प्रतिपादन अध्यक्ष विश्वास चितळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडीचे मुख्याध्यापक संजय मोरे यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ.दीपक देशपांडे यांनी केले.सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केले.आभार सुकुमार किणीकर यांनी मानले.

यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके,सहसचिव के. डी.पाटील,प्रा.मनिषा पाटील,प्रा.महेश पाटील,विजय तेली,विद्या टोणपे,स्मिता माने,सुचेता कुलकर्णी, तुषार पवार आदींसह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆