BANNER

The Janshakti News

पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांची आज सांगली आकाशवाणीवर मुलाखत

 सांगली दि. 17 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 संदर्भात, 44-सांगली लोकसभा मतदारसंघातील ' कायदा व सुव्यस्था ' या विषयावर जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांची जिल्हा माहिती अधिकारी फारूक बागवान यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणी सांगली केंद्रावर आज गुरुवार, दि.18 एप्रिल रोजी सकाळी 9.45 वाजता प्रसारित होईल.

ही मुलाखत 1251 किलोहर्टझ या ए.एम. वाहिनीवर, तसेच 100.6 एफ एम वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर ऐकता येईल.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या मुलाखतीमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदात्यांनी आज सकाळी पाऊणे दहा वाजता प्रसारीत होणारी मुलाखत नक्कीच ऐकायला हवी.

हेही पहा ----

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆