BANNER

The Janshakti News

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एप्रिल व मे महिन्यातील विभागीय लोकशाही दिन रद्द



=====================================
==============================

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीची दि. 16 मार्च 2024 पासून आचारसंहिता सुरू झाली असून दि. 6 जून 2024 पर्यंत आचारसंहिता लागू राहील. आचारसंहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करू नये असे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 26 सप्टेंबर 2012 च्या परिपत्रकात नमूद केले आहे. या अनुषंगाने पूणे विभागातील दरमहा दुसऱ्या सोमवारी होणारा विभागीय लोकशाही दिन माहे एप्रिल 2024 व माहे मे 2024 मध्ये आयोजित केला जाणार नाही, असे विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यात येणार आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags