BANNER

The Janshakti News

महापालिका क्षेत्रात स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रमाव्दारे मतदार जनजागृती


======================================
======================================

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिका क्षेत्रात स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रमाव्दारे मतदार जनजागृती करण्यात येत आहे. भारती मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेज सांगली, नेमिनाथनगर मैदान सांगली, शांतिनिकेतन महाविद्यालय, वॉलचंद कॉलेज सांगली या ठिकाणी विविध उपक्रमाव्दारे मतदार जनजागृती करण्यात आली.

भारती मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेज सांगली येथे व्होटर (voter) हेल्पलाईन या ॲपव्दारे मतदार नोंदणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. नेमिनाथनगर येथे मतदार जनजागृतीचे स्टॉल लावून त्या ठिकाणी युवा मतदारांची नोंदणी, मतदार यादीतील नावे तपासणे, तसेच नवीन मतदार नोंदणीसाठी युवकांना प्रोत्साहित केल व नवीन मतदार नोंदणी व दुरूस्ती साठी असणाऱ्या फॉर्म चे वाटप केले. शांतिनिकेतन महाविद्यालय व वॉलचंद कॉलेज सांगली येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करून मतदार जनजागृती करण्यात आली.







या कार्यक्रमांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, महापालिका क्षेत्राचे स्वीप नोडल अधिकारी तथा मनपा उपायुक्त वैभव साबळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags